Home नाशिक भोंदूगिरीतून महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या

भोंदूगिरीतून महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या

158
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230708-195251_WhatsApp.jpg

भोंदूगिरीतून महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या

नाशिक,(भास्कर देवरे)-नाशिकच्या शिंदे गावातील जनाबाई भिवाजी बेर्डे या महिलेवर धारदार चाकूने वार करून तिची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय नाशिक रोड परिसरातील शिंदे गावात जनाबाई या मजुरीचे काम करायच्या याचबरोबर त्यांच्या अंगात देव येत असल्याने अनेक लोक त्यांच्याकडे समस्या घेऊन जायचे त्या समस्येचे ते निराकरण करायचे संशयित निकेश पवार हा देखील त्याची वैयक्तिक समस्या घेऊन त्यांच्याकडे वर्षभरापासून जात होता आणि त्यांनी सांगितलेले उपाय तो करायचा मात्र त्याला सांगितलेल्या उपायातून एकही लाभ मिळाला नाही त्याच्या समस्येचे निराकरण झाले नाही उलट त्याच्या आयुष्यात समस्या जास्त तयार झाल्याने या नैराश्यातून त्याने जनाबाई बर्डे यांचा धारदार शास्त्राने वार करत खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली संशयित निकेश पवार यास नाशिक रोड पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे.

Previous articleमालेगांव कॅम्प शिवसेना उपविभाग प्रमुखपदी श्री. नरेश सुभाष जगताप यांची निवड
Next articleमालेगाव येथे निशुल्क चिकित्सा शिबीर मोठया उत्सहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here