Home गडचिरोली नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा. – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव...

नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा. – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना आलापल्ली येथील नागरिकांचे निवेदन!

149

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0014.jpg

नाल्याच्या प्रवाह बदलून पुरामुळे होणारे नुकसान टाळा. – माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना आलापल्ली येथील नागरिकांचे निवेदन!           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

आलापल्ली येथील वार्ड क्रमांक ०६ मध्ये नाल्याच्या पुरामुळे अनेकदा नुकसान झाले.त्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्याची दिशा बदलवण्याची मागणी वार्ड क्रमांक ०६ मधील नागरिकांनी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे निवेदनातून केले आहे.!

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आलापल्ली येथील ४० वर्षापासून स्थायी रहिवाशी आहोत. आमच्या वार्डा लगत नाला असून दिवसेंदिवस येणाऱ्या पुरामुळे या नाल्याचे पात्र विस्तारत आहे. दरवर्षी पावसाच्या पाण्यामुळे नाल्याला येणाऱ्या पुरामुळे आमच्या वार्डात व घरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे घरातील साहित्य, जनावरे धान्य व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसाना पासून वाचण्यासाठी वन विभागाकडून नाल्याची दिशा बदलून देऊन प्रवाह दुसरीकडे वळवावा. त्यामुळे या वार्डातील घरांचे व नागरिकांचे नुकसान होणार नाही. यावेळी निवेदन देतांना माजी जिल्हा परिषद सदस्य विजया विठ्ठलानी, सुरेखा सॅन्ड्रा,संगीता कोहपरे,सुरेखा धानोरकर,सावित्री भिमोजवार, सुनंदा भीमनपल्लीवार,बंडू धानोरकर, शकुंतला श्रीरामवार,सुशीला आत्राम,माया बासनवार,सोनी मडावी, बानू आत्राम,रामबाई शिवनेरी, रीना रास पुडीवार, इंद्रायणी बोमेनवार,सुरेखा येरमे, रवी रासपुडीवार,मनीषा सॅन्ड्रा, सरिता बंडावार आदी उपस्थित होती!

Previous articleज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मान सन्मान व आदर करणे हेच कर्तव्य…………. खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन…
Next articleगडचिरोली येथे महा अंनिस शाखेतर्फे सामाजिक न्याय दिवस संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.