Home सातारा सातारा जिल्ह्यात मुलीच्या संसारात आई – वडिलांच्या हस्तक्षेपामुळे घटस्फोटाचे वाढते प्रमाण..!लग्न प्रक्रिया...

सातारा जिल्ह्यात मुलीच्या संसारात आई – वडिलांच्या हस्तक्षेपामुळे घटस्फोटाचे वाढते प्रमाण..!लग्न प्रक्रिया ठरते पैश्याचा बाजार…?

252
0

आशाताई बच्छाव

IMG-20230625-WA0020.jpg

सातारा जिल्ह्यात मुलीच्या संसारात आई – वडिलांच्या हस्तक्षेपामुळे घटस्फोटाचे वाढते प्रमाण..!लग्न प्रक्रिया ठरते पैश्याचा बाजार…?

सातारा ( अंकुश पवार, ठाणे / सातारा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, दैनिक युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल)

आज काल मुला मुलींच्या लग्नाचा सिझन सुरू आहे गावी गावी धूम धडाक्यात लग्न समारंभ गाजताना दिसत आहेत. परंतु सातारा जिल्ह्यात फॅमिली कोर्ट केसेस मधून रंजक गोष्ट समोर येत आहे. कोर्टात उभ्या असलेल्या अधिकतर घटस्फोटाच्या केसेस मध्ये मुलीच्या संसारात आई – वडिलांच्या हस्तक्षेपामुळे घटस्फोटाचे कारण वाढत असल्याची तक्रार अनेक ठिकाणाहून समोर येत आहे. मुलींच्या लग्नात अवढ्याव्य खर्च करायचा लग्नाला एक वर्ष ही पूर्ण होऊ न देता मुलीला घरी नेहून मुला कडच्या कडून घटस्फोटाची मागणी करून पोटगी च्या नावाखाली पैसे उकळण्याचा टोळी सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
आधी मुंबई पुणे मधील मुलाशी लग्न करून द्यायचे नंतर वारंवार भेटून, मोबाईल फोन वरून मुलीच्या संसारात दाखल देऊन मुलाच्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करायचा, मुला बदल स्वतःच खोट्या अफवा पसरवत ठेवायच्या नंतर अचानक मुलावर फसवणुकीची केस करून घटस्फोट मागण्याचा आणि पोटगी ची मागणी करायची असे अनेक प्रकरणे सातारा जिल्ह्यात घडतं आहेत. अनेक प्रकरणात आपल्याच गावातील लग्न ठरविणाऱ्या मध्यस्तीच्या माध्यमातून आपल्याच गावातील पुणे मुंबई येथे नोकरी किंवा नोकरी करणाऱ्या मुलांसोबत घरी काही संस्कार न मिळालेल्या कामाची काही अनुभव नसलेल्या मुली ह्या अश्या मुलांशी लग्न करून देतात नंतर वर्षभर सुधा मुली ह्या सासरी सुखाने नांदू देत नाहीत अनेक वेळा वारंवार सासारी येऊन मुलीला माहेरी घेऊन जातात नंतर सासरच्या लोकांवर महिला अत्याचार कायद्या अंतर्गत सारखा भयानक केसेस टाकून लग्नात झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई आमच्या मुलीवर घरघुती अत्याचार केला या कायद्याचा गैर फायदा घेऊन बैकमैल करून पैसे वसूल कण्याची नवी ट्रिक समजात रुठ होताना दिसते आहे. त्या अंतर्गत संबंधित वर पक्षाच्या इतर लांबच्या नातेवाईकांना ही कोर्ट केस मध्ये नाव टाकून ब्लॅक मैल व मानसिक त्रास देण्याचा व समाजात नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. काही प्रकरणात तर समंधित केस करणारे वधू पक्ष्य हे वकिलांना ही अंधारात ठेऊन पैश्याचा जोरावर काही पुरावे नसताना वर पक्षाच्या सदस्यांना व खोटे गुन्हे कलम दखल करून मानसिक त्रास व आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देश्याने प्रक्रिया केली जाते.कोर्टात खोटे पुरावे व खोटे आरोप करून संबंधित वर पक्षाच्या करून भली मोठी रक्कम वसूल करून त्या घटस्फोट मुलीचे पुन्हा दुसरे लग्न लाऊन दिले जाते. अश्या अनेक केसेस इ कोर्ट फॅमिली कोर्ट मध्ये सातारा जिल्ह्यातील तालुक्यात सुरू आहेत. त्यामुळे लग्न प्रक्रिया आता खरच पैशाचा बाजार बनला आहे का ..? किंवा लग्न समारंभ हि प्रक्रिया ही या पुढे फक्त नावापुरते लग्नाचे पवित्र राखले जाणार की नाही याचा विचार दोन्ही पक्ष्याचा वतीने केला गेला पाहिजे

Previous articleआझाद ग्रुपचे तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या पाठपुराव्याला यश
Next articleडमी पावतीबुकाद्वारे कारखानदारांची फसवणुक करणाऱ्या गुंडेवाडीचे सरंपच मनोहर पोटे विरूध्द गुन्हा दाखल करावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here