Home जळगाव अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती कळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर माहिती...

अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती कळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर माहिती कळविणा-याचे नाव राहणार गोपनीय

184

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0001.jpg

अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती कळविण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
माहिती कळविणा-याचे नाव राहणार गोपनीय

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

जळगाव | जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुक रोखणेसाठी जिल्हास्तरीय विविध विभागांचे समन्वयातून पथकांची निर्मिती करणेत आलेली आहे. सर्व आवश्यक उपाययोजना करुन जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक ते प्रयत्न करणेत येत आहे. अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती सजग नागरिकांकडुन जिल्हा प्रशासनाला
मिळाल्यास अधिक परिणामकारक कारवाई करणे शक्य होईल. जनतेचे अधिकाधिक सहकार्य मिळवून अवैध गौणखनिजाचे साठा, उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळविले आहे.
सामान्य नागरिकांना अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला कळविणेसाठी नागरिकांना 9209284010 हा हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाद्वारे उपलब्ध करुन देणेत येत आहे. नागरिकांनी 9209284010 या हेल्पलाईन क्रमांकावर अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत बाबत व्हॉटसअपद्वारे घटनेचे
छायाचित्र/चलचित्रफित (फोटो/व्हिडीओ), घटनेचे
ठिकाण, गुगल लोकेशन कळविल्यास प्राप्त तक्रारी बाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरुन तात्काळ कारवाई करणेत येणार आहेत.
अवैध गौणखनिजाबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवणेत येईल, तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाला सहकार्य करणेचे आवाहन करण्याचे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे

Previous articleभारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पार्डी ग्रामपंचायत कार्यालयास भेट.
Next articleकागदावरच्या योजनांना गरिबांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.