Home नांदेड लोहा शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदी अर्जुन सुरेशराव महाबळे यांची निवड निवड

लोहा शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदी अर्जुन सुरेशराव महाबळे यांची निवड निवड

215
0

आशाताई बच्छाव

IMG-20230619-WA0075.jpg

लोहा शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदी अर्जुन सुरेशराव महाबळे यांची निवड निवड
अंबादास पाटील पवार
लोहा/प्रतिनिधि
लोहा शहर काँग्रेस कमिटी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून लोहा शहर उपाध्यक्षपदी अर्जुन सुरेशराव महाबळे यांना नांदेड येथील पक्ष कार्यालयात एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
काँग्रेस कमिटी पक्ष कार्यालय नांदेड येथे दिनांक १९ जून रोजी लोहा शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून लोहा शहर उपाध्यक्षपदी उच्चशिक्षित, अभ्यासू, सक्रिय चळवळीतील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, गोर गरीब जनतेच्या कामासाठी सदैव रस्त्यावर असणारे अर्जुन महाबळे लोहा शहर उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी मंत्री डीपी सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजुरकर, संजय देशमुख लहानकर, बाळासाहेब देशमुख बारडकर, लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनुभाऊ संगेवार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत युथ पत्र देण्यात आले.
अर्जुन महाबळे यांच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांकडून,कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here