Home नांदेड आ. श्यामसुंदर शिंदे यांनी केला अनाथ मुलांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा

आ. श्यामसुंदर शिंदे यांनी केला अनाथ मुलांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा

237
0

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0039.jpg

▪️ आ. श्यामसुंदर शिंदे यांनी केला अनाथ मुलांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा

▪️ लोहा तालुक्यात आ. श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा

अंबादास पाटील पवार
लोहा, प्रतिनिधी
लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त लोहा कंधार मतदारसंघांमध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप , अनाथ मुलांना शालेय गणवेश व मिठाईवाटप यासह अनाथ मुलांच्या सोबत केक कापून आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला, दिनांक 15 जून रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नांदेड येथील स्मेरा निवासस्थानी आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आले होते, या अभिष्टचिंतन सोहळ्यास लोहा कंधार तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते, नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी अधिकारी यांनी आमदार शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती, आमदार शिंदे यांच्या वाढदिवसाचे आकर्षण म्हणजे सामाजिक बांधिलकी जोपासत आमदार शिंदे यांनी अनाथ मुलांच्या हातून केक कापून आपला वाढदिवस साजरा केला, मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रक्तदान केले, लोहा येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला, आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित दादा पवार सह प्रसिद्ध उद्योगपती कृपाकर रेड्डी सह अनेकांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना शुभेच्छा दिल्या ,यावेळी शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शिंदे, मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा शिंदे, सह सर्व राजकीय,सामाजिक,व्यावसायिक,शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी सह अधिकारी,कर्मचारी सह मित्रमंडळी आणि शिंदे परिवार समवेत नांदेड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleपुणेतल्या मारुंजीत शाळेचे लोकार्पण           
Next articleउस लागवड मार्गदर्शनासाठी संचालक मंडळ आऋल्या दारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here