आशाताई बच्छाव
जोपर्यंत शिक्षक भरती होणार नाही तोपर्यंत एकही शिक्षक सोडणार नाही
पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नासंदर्भात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असून जोपर्यंत शिक्षकभरती केली जात नाही तोपर्यंत आंतरजिल्हा बदलीने एकही शिक्षक सोडणार नाही, तसेच शिक्षकांच्या बदलीसाठी पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आरोप काही वृत्तवाहिन्यांनी केले असले तरी हे आरोप बिनबुडाचे असून असे काहीही घडलेलं नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी स्पष्ट केले आहे.
आज दिनांक३०
जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
उपाध्यक्ष पंकज कोरे, समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी शेलार, बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
जलजीवन मिशन मधील जी कामे पूर्ण झालेली आहेत त्याच कामांची बिले अदा केली असून कुठल्याही ठेकेदाराला आगाऊ रक्कम देण्यात आलेली नाही असे देखील अध्यक्ष निकम यांनी यावेळी स्पष्ट केले.
अनुकम्पा भरती प्रमाणे ग्रामपंचायत मधील १०% भरती देखील लवकरच करण्यात येणार असून हातपंप कर्मचारी कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी पत्रकारांना दिली.
तसेच वेळोवेळी पत्रकारांनी जागृत केल्यामुळे जिल्हा परिषदेचा जास्तीत जास्त निधी खर्च करून यावर्षी जिल्हा परिषद दायित्वात राहिली नाही असे सांगून उपस्थित पत्रकारांचे आभार व्यक्त केले.
वाचन लेखन प्रकल्प,तालुक्यातील आढावा बैठका, बायोमेट्रिक हजेरी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य असणे, व इतर अनेक नवीन उपक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून सुरू केले आहेत ने यापुढेही नियमितपणे सुरू राहतील, असे प्रतिपादन अध्यक्ष निकम यांनी केले.
यावेळी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया चे प्रतिनिधी उपस्थित होते.