Home मुंबई स्वराज्य संघटनेतील नियुक्ती सार्थकी लावणार नियुक्ती प्रसंगी सौ सविता तावरे यांचे प्रतिपादन–

स्वराज्य संघटनेतील नियुक्ती सार्थकी लावणार नियुक्ती प्रसंगी सौ सविता तावरे यांचे प्रतिपादन–

135
0

आशाताई बच्छाव

IMG-20230524-WA0045.jpg

स्वराज्य संघटनेतील नियुक्ती सार्थकी लावणार

नियुक्ती प्रसंगी सौ सविता तावरे यांचे प्रतिपादन–

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

भारत सरकार मान्यता प्राप्त व आयएसओ मानांकित
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य नूतन विश्वस्त मंडळ राज्य संचालक मंडळ व विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे यांच्या आदेशानुसार व संघटनेचे कर्तव्यदक्ष महासचिव कमलेश (देवा) शेवाळे यांच्या शिफारशीनुसार संघटनेच्या विश्वस्त व संचालक मंडळांना पदोन्नती देण्यात आली असून स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या संचालक तथा मुंबई विभाग सचिवपदी सौ सविता तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या निवडीनंतर सौ सविता तावरे यांनी भारत सरकार मान्यता प्राप्त स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या विस्तारासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आपण संघटनेच्या उत्कर्षासाठी आपण सक्रिय होणार आहे.स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दिपक कांबळे, मुख्य महासचिव कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा विश्वस्त धनश्री उत्पात यांनी संचालक पदावर नियुक्ती केली. यांच्या विश्वासावर संचालक पदाला योग्य न्याय नक्कीच देण्याचा माझा प्रयत्न असेल. संघटनेमुळे माझी आणि आपल्या कार्याची ओळख अनेक जिल्ह्यात महाराष्ट्रात होत आहे. तसेच मुंबई पदाधिकारी हा संघटनेचा महत्वाचा भाग आहे आणि ते कार्याच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर आहेत आणि असतील बाकी संघटना वाढीसाठी सुद्धा आम्हीं छान असे नियोजन करून संघटनेचे संघटन केले आहे, करीत आहोत. आणि जास्तीत जास्त संघटनेचा प्रचार, पसार कसा करता येईल इकडे लक्ष देत आहे.संघटनेला नावारूपाला आणण्यासाठी एक मताने व एक विचाराने विश्वस्त, संचालक मंडळ तसेच मुंबई विभाग व जिल्हा कार्यकारिणीला विश्वासात घेऊन आपण कार्य करणार आहोत असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष दीपक जी कांबळे व संघटनेचे मुख्य महासचिव कमलेश जी शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढील प्रमाणे नियुक्ती व पदोन्नती देण्यात आली आहे-
सौ धनश्रीताई उत्पात विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य महिला राज्य संपर्क प्रमुख, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य समन्वयक,भरत नजन,विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख उमेश काशीकर, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव योगेश पाटील, आणि विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हारुनभाई शेख यांची निवड जाहीर केली.
संचालक तथा मुंबई विभाग सचिव सौ सविता तावरे, संचालक तथा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सौ मंजुषा डोईफोडे,संचालक तथा पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ संगीता बोराडे, संचालक तथा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस योगेश ददंणे ,संचालक तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत निकम, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष जावळे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

Previous articleछत्रपती शंभुराजे परिवार (वेड इतिहासाचे)           
Next articleनाशिक शहर पोलिस उपायुक्तपदी मोनिका राऊत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here