Home पालघर वावर वांगणी आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वावर वांगणी आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

124

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

वावर वांगणी आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मोखाडा प्रतिनिधी :- सौरभ कामडी

जव्हार तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत वावर वांगणी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थींना आधारकार्ड शिबिर दिनांक ८ मे २०२३ ते ९ मे २०२३ असे दोन दिवस मोफत आयोजित करण्यात आला .त्यावेळी या शिबिरास नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला या शिबिराचा २०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला असून यामध्ये नाव दुरुस्त, मोबाईल नंबर लिंक करणे,पत्ता बदलणे ,जन्मतारीख दुरुस्त असे करण्यात आले .
यामध्ये पूर्वी ठाणे जिल्हा असून २०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा करण्यात आला तर सगळ्यांचे आधारकार्ड वर पालघर ऐवजी ठाणे जिल्हा असून काही कामामध्ये अडथळा येत असून काही नागरिक हे खूपच हैराण झाले आहेत तर या वेळी या शिबिराची वाढीव मागणी केली आहे या मध्ये ३ आधारकार्ड सेंटर उपलब्ध करून दिले होते .यावेळी ग्रुप ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच विनोद बुधर व सदस्य यशवंत बुधर साहेब,महसूल विभागाचे अधिकारी भराडे साहेब , व रोजगार सेवक चिंतामण गोंड , बाळु बुधर,बापू बुधर व इतर सर्व नागरिक उपस्थित होते

Previous articleएस टी बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवाशी जखमी ३५ प्रवाशी जखमी.जिवीतहाणी टळली.
Next articleवावर वांगणी आधारकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.