Home मुंबई वंदे भारत सज्ज…! मुंबई ते शिर्डी प्रवास ५ तास ५५ मिनिटात.

वंदे भारत सज्ज…! मुंबई ते शिर्डी प्रवास ५ तास ५५ मिनिटात.

240

आशाताई बच्छाव

IMG-20230207-WA0010.jpg

वंदे भारत सज्ज…!
मुंबई ते शिर्डी प्रवास ५ तास ५५ मिनिटात.

मुंबई : ( विजय पवार )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेली वंदे भारत एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली आहे. येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई येथून या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंदे भारत घाटामधून कसा प्रवास करते याची चाचपणी घेण्यात आली.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून जवळपास सकाळी ११ वाजता वंदे भारत निघाली आणि इगतपुरी दरम्यान ती एक ते दीड ते वाजेच्या सुमारास पोहोचली. या गाडीमध्ये रेल्वेचा ठराविक स्टाफ व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

कसारा विभाग घाट सेक्शन असल्याने येथून मार्गस्थ होणाऱ्या रेल्वे गाड्यांना घाट चढण्यासाठी मागून बँकर (इंजिन) लावावे लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेसने बिना बँकर घाट पार केला असून तिला कुठल्याही प्रकारचे बँकर लावण्यात आलेले नाहीत. या गाडीच्या दोन ते तीन दिवस चाचणी फेऱ्या होणार आहेत असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

वंदे भारत ट्रेन बघण्यासाठी नागरिकांनी इगतपुरी स्थानकावर गर्दी केली होती. सदरील गाडी मंगळवार वगळता नियमितपणे मुंबई-शिर्डी धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी शिर्डीकडे रवाना होणार आहे. तर शिर्डी रेल्वे स्थानकात दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंत पोहोचणार आहे. तसेच शिर्डीहून सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघणार आहे, तर मुंबईत रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी पोहोचणार आहे. भारत एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी ५ तास ५५ मिनिटात प्रवास होणार आहे.

मुंबई-सोलापूर बरोबरच मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असल्याने साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Previous articleनाशकात ठाकरे गटातील गळतीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंची सभा
Next articleसुप्रिया सुळेंची दहा वर्षांत संपत्ती वाढली १७३ टक्क्यांनी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.