
राजेंद्र पाटील राऊत
व-हाणेत सुरु आहे बोगस व नित्कृष्ठ रस्त्याचे कामकाज !!
राजेंद्र पाटील राऊत
मालेगांव- तालुक्यातील व-हाणे ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेले रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे व बोगस पध्दतीने होत असल्याची तक्रार व-हाणेतील एका जागृत नागरिकाने “युवा मराठा न्युज”कडे सदर बोगस कामाचे व्हिडीओ चित्रीकरण पाठवून केली आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार व-हाणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सोनजकडे जाणाऱ्या मराठी शाळेजवळील रस्त्याचे सध्या डांबरीकरणाचे काम सुरु असून,सदर कामात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून,रस्ता अपूर्ण व अरुंद करण्याबरोबरच सदर डांबरीकरणाच्या रस्त्यावर डांबर ओतण्यापूर्वीच वापरण्यात आलेले साहित्य हे बोगस व हलक्या प्रतीचे असल्यामुळे सदर रस्ता फक्त शासनाचा निधी लाटण्यासाठीच बनविला जात असल्याची शंका यानिमिताने उपस्थित होत आहे.आज रोजी सदर रस्त्यासाठी वापरण्यात आलेल्या हलक्या प्रतीचे साहित्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाश्यांचा घरात पुर्णपणे धुराळा उडून घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे.त्यामुळे वाहनाच्या रहदारीने दिवसभर उठणा-या फुफाटयामुळे स्थनिक रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आलेले असून,सदर रस्त्याचे बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराची कसून चौकशी करण्यात येऊन,या भ्रष्टाचार प्रकरणात गुंतलेल्याची चौकशी तात्काळ चौकशी केली जावी अशी मागणी आता पुढे येत आहे.