Home Breaking News आजचे आरोग्य सदर शनिवार (२१जानेवारी) हिवाळ्यात लहान बाळांची काळजी

आजचे आरोग्य सदर शनिवार (२१जानेवारी) हिवाळ्यात लहान बाळांची काळजी

196
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0013.jpg

आजचे आरोग्य सदर
शनिवार (२१जानेवारी)

हिवाळ्यात लहान बाळांची काळजी

(युवा मराठा न्युज नेटवर्क)

थंडीत लहानग्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.
विशेषतः एक वर्षाच्या आतील मुलांना थंडीचा त्रास होण्याची शक्यता असते. थंडीमुळे त्यांच्या त्वचेवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. थंडीचा कडाका त्यांना आजारी पाडू शकतो. गारठ्यामुळे हसतं खेळतं मूल अचानक हसतं-खेळतं मलूल होतं. म्हणूनच बदलत्या वातावरणाचा कमीत कमी परिणाम होईल आणि त्यांना कमीत कमी त्रास सोसावा लागेल याची आपण काळजी घ्यायला हवी. या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील अशा काही टिप्स जाणून घेऊ या.
थंडीत लहानग्यांना मऊ आणि ऊबदार कपडे
घालावेत. बरेचदा थंडीत लहानग्यांची काळजी लोकरीचे कपडे घातले जातात. मात्र लोकर कडक, टोचरी, निकृष्ट दर्जाची अथवा अस्वच्छ असेल तर त्यांना त्वचाविकार संभवतात. म्हणूनच ऊबदार कपड्यांची वेळच्या वेळी स्वच्छता व्हावी. घराबाहेर पडताना डोकं, कान, नाक झाकेल अशी टोपी घालावी. बाहेर पडतानाचे कपडे लेअर्ड असावेत.  थंडी असली तरी मुलांना आंघोळ घालायलाच हवी पणदुपारी उन्हं चढल्यावर आंघोळ घालणं अधिक चांगलं. आंघोळीसाठी अगदी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर योग्य ठरतो. गरम पाणी मुलांच्या नाजूक त्वचेसाठी अयोग्य ठरतं त्याचबरोबर यामुळे त्वचा कोरडी पडण्याचा धोकाही वाढतो. महत्त्वाचं म्हणजे आंघोळीपूर्वी मुलांना मसाज करावा. बदामाच्या अथवा नारळाच्या तेलाने मसाज केल्यास त्यांना शरीरात आवश्यक ती उष्णता निर्माण होईल आणि अंघोळीचा त्रास होणार नाही. मात्र मसाज आणि आंघोळ याचा एकत्रित कालावधी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त नसावा.
 आंघोळीनंतर मुलांना सौम्य नरिशिंग क्रीम लावावं. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकते त्याचबरोबर मुलांची त्वचा देखील मऊ राहते.  रात्री थंडीचा त्रास होऊ नये या दृष्टीने मुलांना भरपूर पांघरुण घालावे. मात्र जाड ब्लंकेटमुळे गुदमरण्याचा धोका लक्षात घेता त्यांना ऊबदार कपडे घालणं आणि हलकं पांघरुण घालणं अधिक सुरक्षित समजलं जातं.
रात्री झोपताना मुलांच्या खोलीच्या खिडक्या- दारं व्यवस्थित बंद करावीत. मात्र हिटरचा वापर करणार असाल तर खोलीचं तापमान अधिक वाढणार नाही याची खात्री करावी. हिटरचा ऑटो कट ऑफ योग्य पद्धतीने काम करत असल्याची खात्री करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here