Home जालना शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे लहान शाळकरी मुलांचा जिव धोक्यात ः नंदाताई पवार

शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे लहान शाळकरी मुलांचा जिव धोक्यात ः नंदाताई पवार

145

आशाताई बच्छाव

Screenshot_20230121-064648_Google.jpg

शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे लहान
शाळकरी मुलांचा जिव धोक्यात ः नंदाताई पवार
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) ः जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र सुळसुळाट वाढल्याने नागरीकांना व वाहनधारकांना मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागत आहे. मोकाट कुत्रे लहान शाळकरी मुलांवर अचानकपणे हल्ला करीत असल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोकाट कुत्र्यांचा नगर परिषद प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार यांनी केली आहे.
शहरातील काही चौकामध्ये मोकाट कुत्र्यांचे घोळके एकत्रीत होवून हे कुत्रे रस्त्यावरून वाहनचालकांवर अचानकपणे हल्ला करतात. त्यामुळे शहरामध्ये अनेक अपघात होवून नागरीक जखमी झालेले आहे. तसेच शाळेत जाणाऱ्या लहाण शाळकरी मुलांवर त्यांचा पाठलाग करून त्यांना खाली पाडतात आणि चावा घेण्याचा देखील अनेक घटना घडलेल्या आहेत. यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा देखील समावेश आहे. परंतू नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही. याविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहे. तत्कालीन नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला होता. परंतू नगर परिषदेवर प्रशासक आल्यापासून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही ही खेदजनक बाब असल्याचे नंदा पवार यांनी सांगीतले. शहरातील महात्मा फुले मार्केट (सिंदीबाजार), रहिमानगंज चौक, कन्हैयानगर परिसर, जुना मोंढा, बसस्थानक, गरीबशहा, मंगळबाजार, नुतन वसाहत, मंमादेवी रेल्वेस्टेशन रोड, मिलन चौक जुना जालना, देहडकरवाडी आदी भागात या मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. नगर परिषद प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्य पुर्वक पाऊल उचलावे अशी मागणी नंदाताई पवार यांनी केली आहे. येत्या आठ-दहा दिवसात प्रशासनाने पाऊल उच

Previous articleराज्यस्तरीय शालेय वुशू (17 व 19 वर्षाआतील मुले-मुली) क्रीडा स्पर्धाचे आयोजन
Next articleआजचे आरोग्य सदर शनिवार (२१जानेवारी) हिवाळ्यात लहान बाळांची काळजी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.