Home नांदेड उंच उडी क्रीडा स्पर्धेत कमळेवाडी आश्रम शाळेचा मारुती गरसुळे जिल्ह्यात प्रथम !

उंच उडी क्रीडा स्पर्धेत कमळेवाडी आश्रम शाळेचा मारुती गरसुळे जिल्ह्यात प्रथम !

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20221219-WA0030.jpg

उंच उडी क्रीडा स्पर्धेत कमळेवाडी आश्रम शाळेचा मारुती गरसुळे जिल्ह्यात प्रथम !
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सध्या जिल्हास्तरीय स्पर्धा नांदेड येथे सुरू असून परवा झालेल्या ॲथलेटिक्स उंच उडी क्रीडा प्रकारात माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी चा विद्यार्थी मारुती गरसुळे याने चमकदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
यापूर्वी मारुती गरसुळे यांनी तालुकास्तरीय ॲथलेटिक्स उंच उडी क्रीडा प्रकारात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला होता. त्यानंतर त्याची जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेसाठी निवड झाली होती.
नांदेड येथे परवाला झालेल्या ॲथलेटिक्स उंच उडी क्रीडा प्रकारात मारुती गरसुळे यांने आपली विजयाची परंपरा कायम राखत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
मारुती गरसुळे याच्या या यशाबद्दल माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आर.डी. राठोड , संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शमशुद्दीन शेख, क्रीडा विभाग प्रमुख उत्तम कुमार हनमंते, सहमार्गदर्शक लक्ष्मण डावकरे, संदीप गुंटूरकर , जाधव सर, नामदेव शिंदे, शेख जाकीर संदीप कदम , प्रकाश जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleशांती निकेतन विद्यालयातील हॉलीबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड…
Next articleबिना परवाना किती वाहतूक करताना पाच मोठे जड वाहन पकडले तहसीलदार गायकवाड यांची धाडसी कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here