आशाताई बच्छाव
अकोला देशमुख समाजाच्या २५ डिसेंबरच्या वधू-वर राज्यस्तरिय परिचय मेळाव्याला भरगच्च प्रतिसाद !
अनेक मान्यवरांसोबत अभिनेत्री प्रतिक्षा देशमुखचीही उपस्थिती
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा
अकोला -अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळ, महिला मंडळ व देशमुख जागृती मंडळ या तिनही नोंदणीकृत अधिकृत मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरिय वधू- वर परिचय व समाजबांधव स्नेह मिलन मेळावा जानोरकर मंगल कार्यालय,गोरक्षण रोड अकोला येथे संपन्न होत आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी करून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि सभासद संघटीत प्रयत्न करीत आहेत.या मेळाव्याची माहिती घेण्याचे प्रयत्न महाराष्ट्र आणि ईतर राज्यांतूनही सुरू असून देशमुख समाजाचा हा कार्यक्रम यावेळी २००० हजारांच्या उपस्थितीत संपन्न होईल असा मनोदय आयोजकांनी व्यक्त केला आहे.
अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळासोबतच, देशमुख महिला व जागृतीच्या युवा पदाधिकाऱ्यांच्या अचूक नियोजनातून वार्षिक दिनदर्शिका आणि शुभमंगलम् वधू वर मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशनासाठी तयार आहे.यावर्षी सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांसोबतच अभिनेत्री प्रतिक्षा रामराव देशमुख हिने अकोल्यात येऊन समाजबांधवांना भेटण्याचा मनोदय व्यक्त केला.वधू वरांच्या अद्यायावत माहितीसाठी पुस्तिकेसोबतच एका वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. स्वागत गीत ,स्वागत समारंभ आणि मान्यवरांची मार्गदर्शने तथा समाजातील नामवंत व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराचे वितरण,निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण,या सर्व कार्यक्रमानंतर उपस्थित समाजबाधवांसाठी या राज्यस्तरिय मेळाव्यात स्नेहभोजनाचा कार्यक्रम अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. या समारोहात येणारांची नोंदणी व शुभमंगलम् पुस्तकाचे वितरण यावेळी केले जाणार आहे.या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 8788602633 9850368469 9921328920 9422882777 7588961260 9975081769. 758896126 9049976600 9890257735 या मोबा.क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख,निंबेकर,महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.राजश्री प्र.देशमुख,देशमुख जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय कृ.देशमुख( कंझारेकर) व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.