Home नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20221207-WA0017.jpg

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था द्वारा संचलित आयडियल इंग्लिश स्कूल देगलुर येथे 6 डिसेंबर 2022 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेस संचालक प्रा. सोनकांबळे मारोती लक्ष्मणराव सर, प्राचार्या सुनंदा मॅडम, प्रियंका मॅडम,रुपाली मॅडम दिव्या मॅडम, दंतुलवार मॅडम, समीक्षा सोनकांबळे, तसेच सर्व पालक, सुगावे ताई,माधव कांबळे सर,अनुराधा कांबळे, रानी ताई, भूताळे ताई आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी महामानवास पुष्पहार व पुष्प वाहून विनम्र अभिवादन केले . त्याच बरोबर प्रथम सत्र परीक्षांमध्ये उत्कृष्ट पेपर लिहून गुणवत्ता सिद्ध केलेल्या आणि वेगवेल्या स्पर्धेत प्रथम द्वितीय, तृतीय, स्थान पटकावलेल्या व सुंदर अक्षर स्पर्धा, वाचन स्पर्धा, यात यश संपादन केलेल्या अशा सर्व विविद्यार्थ्यांचा पेनशिल व पूष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, खेळांची स्पर्धा यात सहभागी होऊन उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी पुष्प गुच्छ देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पालक आपल्या मुलांच्या शिक्षणा संदर्भात सुसंवाद साधला आणि आपले मनोगत व्यक्त केले. आणि पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संचालक पालकांशी सुसंवाद साधून समस्या जाणून घेतल्या व सर्व पालकांशी हितगुज केले. तसेच प्रा. सोनकांबळे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला. आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा बाबसाहेब आंबेडकर यांचा कार्यातून मिळाली यासंदर्भात आपले विचार मांडले. अशा प्रकारे महामानव, युगपुरुष, बोधिस्त्व डॉ. बाबसाहेब यांचा महापरिनिर्वाण दिन पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी व आयडीयल इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रियंका मॅडम केले आणि आभार रुपाली अकुलवार मॅडम यांनी मांडले.

Previous articleआंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त देगलूर येथील अंध विद्यालयात अन्नदान व मिठाईवाटप.
Next articleअखेर डॉ. प्रतापराव दिघावकरांच्या प्रयत्नांना यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here