Home नांदेड शिवाजी इंगोले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित !

शिवाजी इंगोले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित !

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20221205-WA0035.jpg

शिवाजी इंगोले शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित !
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसी (खुर्द) येथील सहशिक्षक शिवाजी गोविंदराव इंगोले यांना नुकतेच शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्र संकुल गोणारच्या वतीने त्यांना नुकतेच कंधार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री बालाजीराव शिंदे यांच्या शुभहस्ते शाल, फेटा, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री कैलास होनधरणे, केंद्रप्रमुख चंद्रकांत मोरे, केंद्रप्रमुख जयवंतराव काळे, केंद्रप्रमुख गणेश थोटे केंद्रप्रमुख संतोष दिनकर ,ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंदराव केंद्रे, मुख्याध्यापक आर.डी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री शिवाजीराव इंगोले हे विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील शिक्षक म्हणून संकुलात परिचित आहेत.
यापूर्वी त्यांना मुखेड पंचायत समितीचा गुरु गौरव पुरस्कार व गुणी शिक्षकरत्न पुरस्कार मिळालेला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची शैक्षणिक वर्तुळात ओळख आहे.
शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे यशवंत बोडके, प्रा. ज्ञानोबा जोगदंड, दादाराव आगलावे, अशोकराव पवळे, विठ्ठलराव वडजे, दिलीपराव देवकांबळे, भागवत पाटील बेळीकर, गजानन पाटील शिरूरकर, गोपाळ किरपणे, संजय कोडगिरे, गंगाधरराव वडगावे, कल्याण पाटील इंगळे, शरद डावकरे पद्माकर जवळदापके , बळवंत डावकरे, नामदेव सूर्यवंशी, राम जाधव, सुरेश जाधव, श्रीराम मोरे, माधव पाटील तुपदाळकर, गजानन पईतवार, मारुती सूर्यवंशी, मारुती बारहाळे, माधव माधसवाड, ज्ञानेश्वर साळुंखे, जगताप सर आदी शिक्षक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here