Home नांदेड मुखेड – लेंडी प्रकल्पग्रस्त लोकांचा प्रश्न मार्गी – आ.तुषार राठोड

मुखेड – लेंडी प्रकल्पग्रस्त लोकांचा प्रश्न मार्गी – आ.तुषार राठोड

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20221022-WA0032.jpg

मुखेड – लेंडी प्रकल्पग्रस्त लोकांचा प्रश्न मार्गी – आ.तुषार राठोड
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्पातील बाधित पुनर्वसित गावठाणमध्ये जमीन संपादित होऊ शकली नाही किंवा अंशतः जमीन संपादित झाल्यामुळे सर्व कुटुंबाच्या पुनर्वसनाकरिता जमीन अपुरी पडत आहे . लेंडी बाधित क्षेत्रातील या गावातील स्वेच्छा पुनर्वसन करण्याबाबत ३२ ९ कुटुंबांना १६ कोटी ४२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत . उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणीस यांनी या निधीस मान्यता दिल्याची माहिती मुखेड – कंधारचे भाजपा आ . डॉ . तुषार राठोड यांनी दिली आहे . मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे लेंडी प्रकल्प होत आहे . लेंडी प्रदान प्रकल्पांतर्गत वाढीव कुटुंबांना विशेष अनुदान देणे व ज्या मूळ कुटुंबांना जमीन उपलब्ध नाही ,
त्यांना स्वेच्छा पुनर्वसन अनुदान देण्याची मागणी आमदार तुषार राठोड यांनी राज्य शासनाकडे केली होती . गोणेगाव तालुका मुखेड येथे लेंडी नदीवर मातीच्या धरणाचे काम गेल्या ३६ वर्षापासून सुरू आहे . परंतु कधी भूसंपादनातील अडचणीमुळे तर कधी निधी अभावी हा प्रकल्प रखडला आहे . १२ गावे या प्रकल्पाच्या पुढील क्षेत्रात येतात . त्या बारा गावातील प्रकल्प ग्रस्तांसाठी व्यवस्थित पुनर्वसन झाल्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे . परंतु या प्रकल्पग्रस्तांनी गत ११ वर्षापासून त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करून या प्रकल्पाचे काम बंद पडले आहे . नागरी सुविधा बरोबर स्वेच्छा पुनर्वसन अनुदान झालेल्या वाढीव कुटुंबांना विशेष अनुदान देण्यात यावे अशा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत . दहा गावठाण गावांपैकी ४ गावठाणातील नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत . २ गावठाणातील सुस्थितीत असलेल्या नागरी सुविधा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत . वळंकी , कोळनूर , इटग्याळ ( प.मु. ) या गावात पुनर्वसनसाठी जमीन उपलब्ध नसल्याने लेंडी प्रकल्प बाधितांचे स्वेच्छा पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली . त्यानुसार राज्य शासनाने इटग्याळ ( प.मु. ) येथील १६५ कुटुंबांना ८२३.३५ लाख , कोळनुर येथील ३० कुटुंबांना १४ ९ .७० लाख तर वळंकी येथील १३४ कुटुंबांना ६६८.६६ लाख अशा एकूण ३२९ कुटुंबांना १६.४२ कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत . त्यामुळे या भागातील लेंडी प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे , अशी माहिती भाजपा आ . डॉ . तुषार राठोड यांनी दिली आहे . राज्यातील भाजपा व शिंदे सेनेच्या सरकारमुळेच लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या बाधित कुटुंबीयांना विशेष अनुदान मंजूर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला .

Previous articleशेतकऱ्यांपर्यंत बदलत्या पीक पद्धतीचे नियोजन पोहचणे आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
Next articleमोजणी कामाच्या जलद निपटाऱ्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here