आशाताई बच्छाव
इंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्सची सभा दिल्लीमध्ये संपन्न
स्वप्निल देशमुख
ईलना स्वतंत्र कार्यालयाचा श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांचा प्रस्ताव मंजूर
अकोला… देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) राष्ट्रीय संघटनेची सभा अध्यक्ष श्री परेशनाथ यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अकोल्यातील दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक,जेष्ठ पत्रकार श्री.प्रकाशभाऊ पोहरे व सरचिटणीस कर्नाटकचे श्री.एस.नगन्ना यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.
इंडीयन इंटरनॅशनल सेन्टर च्या सभागृहात आयोजित अडिच तास चाललेल्या या सभेत वरिष्ठ पदाधिकारी डॉ.श्री.संजय गुप्ता(दिल्ली) उपाध्यक्ष श्री.रविकुमार विश्रोई,माजी सरचिटनीस श्री.अंकीत विश्रोई, ( मेरठ,राजस्थान)उत्तर प्रदेश चे अध्यक्ष श्री अरूण भाटीया,दिल्ली प्रदेश अध्यक्ष श्री.देवेन्द्रसिंह तोमर,ओरिसा प्रदेश अध्यक्ष सुधीर पांडा,अकोला येथून ईलना पदाधिकारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- अध्यक्ष श्री संजय एम.देशमुख उपस्थित होते.
या सभेला श्री.राजेन्द्र देशमुख (अकोला),श्री भदौरिया,श्री विपीनजी यांचीही निमंत्रक म्हणून उपस्थिती होती.
या सभेत वृत्तपत्रांच्या जाहिरात वितरणामध्ये केन्द्र आणि राज्यसरकारांकडून होत असलेल्या पक्षपातावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.या जाहिरात वितरणाची प्रक्रिया नियमानुसार राबविली जावी.त्याचप्रमाणे ईलनामार्फत देशातील सर्व वृत्तपत्रांना शासनाकडील समस्यानिवारणात मदतीसाठी सुरळीत सेवाप्रणाली अंमलात यावी.यासाठी दिल्लीत संघटनेचे स्वतंत्र कार्यालय उघडण्यात यावे हा प्रस्ताव श्री प्रकाशभाऊ पोहरे यांनी मांडला.हा विषय त्यांनी प्रखरतेने घेतलेला असून यापूर्वी अकोल्यातूनही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सभेपूर्वी महाराष्ट्र सदनात बसून सुध्दा या व इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याला सर्वांनी सहमती दर्शविली.ईलनाच्या कंपनी अॕक्टमध्ये मुंबईतील असलेल्या नोंदणीमुळे कामातील अडचणी लक्षात घेता ईलनाची प्रथम ज्येष्ठता व स्वरूप कायम ठेऊन ही नोंदणी नव्याने परत दिल्लीमधून सोसायटी अॕक्टमध्ये करण्यात यावी असे यावेळी ठरविण्यात आले.सर्वप्रकारची माहिती सुलभ रितीने मिळण्यासाठी आणि परस्परांमध्ये नियमित संवाद म्हणून एक वेबसाईट बनविण्यात यावी.कार्यकारिणी नियमित सभेशिवाय महत्वाच्या विषयावर चर्चा घडवून निर्णय घेण्यासाठी एक विशेष सभा मुंबईत आयोजित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.