Home नांदेड लाखो रुपये खर्च करुनही रस्त्यावर खड्डे

लाखो रुपये खर्च करुनही रस्त्यावर खड्डे

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20221007-WA0031.jpg

लाखो रुपये खर्च करुनही रस्त्यावर खड्डे
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड –
बाराहाळी ते देगलूर रस्त्यावर उंद्री(प.दे) पासून तडखेलला जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.हा परीसर हा खड्यांचा परीसर म्हणून ओळखला जात आहे.खडे बुजवा पैसे कमवायचा नवीन फतवाच जणू निघाल्याचे चित्र आहे.जाहूर ते देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्याची उंद्री ते तडखेल दरम्यान अक्षरशः चाळणी झाली असून जागोजागी असंख्य खड्डे झाल्याने अपघात घडत आहेत. वाहनधारकास रस्त्यावरून वाहन चालवत असताना अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत असून रस्ता उकडून गेल्याने अपघाताचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. जाहुर ते देगलूर जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने शाळा, महाविद्यालय, दवाखाना ,बाजारपेठ असल्याने मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याची पूर्णतः चाळणी झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता झाला असून सामाजिक बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी संतप्त प्रवाशातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here