Home परभणी लम्पी स्कीन डिसीज या रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर म्हशींच्या वाहतुकीस सशर्त परवानगी

लम्पी स्कीन डिसीज या रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर म्हशींच्या वाहतुकीस सशर्त परवानगी

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20221007-WA0005.jpg

लम्पी स्कीन डिसीज या रोगाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर म्हशींच्या वाहतुकीस सशर्त परवानगी

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी,दि.6 (जिमाका) : भारत सरकारने म्हशींच्या हालचालींसाठी अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. लम्पी स्कीन डिसीज संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरातील बाधित क्षेत्रातून एपी सेंटर पासून एक कि.मी.च्या आत म्हशींच्या हालचालींवर निर्णायकपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. म्हशींच्या नियमित आरोग्य प्रमाणपत्रासह संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून (घोषित एपी सेंटर व्यतिरिक्त क्षेत्र) वाहतूक केली जाऊ शकते. आरोग्य प्रमाणपत्र जारी करण्यासाठी प्राधिकरण राज्य शासन वेगळ्या शासकीय आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करेल. प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील म्हशींची पशुवैद्यकामार्फत तपासणी करावी आणि नैदानिक लक्षणे असलेल्या कोणत्याही प्राण्याला जरी सौम्य लक्षणे दिसली तरीही त्यांना हालचाल करण्यास परवानगी देऊ नये. तसेच वाहतूक करण्यापूर्वी सोबत प्राधिकरणाचे अलीकडील आरोग्य प्रमाणपत्र असावे आणि शक्यतो वाहतुकीपूर्वी पीसीआर चाचणी करून घ्यावी जिचा अहवाल नकारार्थी असावा या अटी देण्यात आलेल्या आहेत.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकार यांनी निर्देशित केले आहे की, म्हशींमध्ये लम्पी चर्म रोगाची सौम्य लक्षणे दिसून आली असून त्याची तीव्रता अत्यल्प आहे. प्राण्यातील संक्रामक व सांसर्गिक रोगांस प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 चा 27 अन्यये अनुसूचित रोग म्हणून घोषित केलेला असून त्यासाठी संपूर्ण राज्याचे क्षेत्र ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here