Home नांदेड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध...

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण..! शंकरसिंह ठाकुर

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220929-WA0065.jpg

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण..! शंकरसिंह ठाकुर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड – राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या आगामी ७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांना गौरविण्यात येणार असून संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी मार्फत प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, वृत्तपत्र विक्रेता, वृत्तपत्र प्रतिनिधी कार्य करतात. त्यांना जीवनगौरव पुरस्कार, वृत्तपत्र संकलन पुरस्कार, वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार, सामाजिक गौरव पुरस्कार, शैक्षणिक गौरव पुरस्कार, कार्य संघटक गौरव पुरस्कार राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून लवकरच राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत .
पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या ची सोडवणूक आणि पत्रकारावरील हल्ले याबाबत पत्रकार संरक्षण कायदा अधिक सक्षम करण्यात यावा युट्युब चॅनेल व समाज माध्यमात कार्यरत पत्रकारांच्या सक्षमीकरण अशा जिव्हाळ्याच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष -विजय सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशध्यक्ष श्री. विजयकुमार व्हावळ , राज्य सल्लागार. बाळासाहेब खंडागळे, राष्ट्रीय महासचिव. विनोद पवार, महाराष्ट्र राज्य प्रदेशध्यक्ष विजयकुमार व्हावळ, राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे, राज्य संघटक, भागवत वैद्य. युवराजसिंग राजपूत राज्य प्रदेशध्यक्ष सौ. मणिषाताई पवार , राज्य संघटक – डॉ. गोपाळराव लाड,राष्ट्रीय सल्लागार – सुभाष बिंदवाल प्रदेशाध्यक्षा. सुनिता तोमर, संतोष जाधव, ज्योती खिलारे , प्रेमलता जाधव राज्य निरीक्षक संतोष जाधव कु- तेजश्री विसपोते. बाळासाहेब, अशोक दादा वायवळ (मराठवाडा कार्याध्यक्ष), रवींद्र ना. जोंधळे (मराठवाडा विभागीय सचिव), अँड. संघरत्न गायकवाड (मराठवाडा विभाग कायदेविषयक सल्लागार)यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे
७ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाची जोरदार तयारी करण्यासाठी विविध समित्या, विविध बैठका, विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय बैठक घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणी कामाला लागली असुन नांदेड जिल्ह्यातील दहा तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली असुन काही तालुक्यांची निवड प्रक्रिया सुरू असून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात काम करण्यास अनेक जण तयार आहेत अशी माहितीही जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांनी दिली.
————————-_-_———–

Previous articleवाशिम जिल्हा सह मालेगाव तालुक्यात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
Next articleजिल्ह्यातील 7 हजार नवदुर्गानी रोजगार मेळाव्यात जागविला आत्मविश्वास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here