Home गडचिरोली देऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ...

देऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0053.jpg

देऊळभट्टी येथील कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र व छत्तीसगड ला जोडणारी- माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी
शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवा               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

कोरची तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त देऊळभट्टी येथे न्यु एकता आदिवासी क्रिडा मंडळातर्फे 1 दिवसीय डे-नाईट भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणुन छत्तीसगड राज्यातील मोहला मानपुर विधानसभेचे आमदार तथा संसदीय सचीव श्री. इंदरशहा मडावी होते. तर अध्यक्ष म्हणुन माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रदेशाध्यक्ष आदिवासी विभाग तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी हे होते. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना डाॅ. नामदेव उसेंडी म्हणाले की, देऊळभट्टी हे गाव सामाजीक व सांस्कृतिक दृष्टया छत्तीसगड व महाराष्ट्र ला जोडणारे असुन या भागातील बहुसंख्य जनता हि छत्तीसगड मधील जनतेशी रुढी भेटीचा व्यवहार करत असल्यानेच या कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील व छत्तीसगड मधील बहुसंख्येने स्पर्धक सहभागी झालेले आहे. त्यामुळे छत्तीसगड व महाराष्ट्रातील सामजिक व सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचे माध्यम हे स्पर्धा करत आहेत. त्यासाठी छत्तीसगड सरकारने महाराष्ट्र राज्यात येण्याजाण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा वाढाव्यात अशी मागणी करण्यात आली. कोटगुल परिसरातील लोकांची विद्युत समस्या दुर करण्यासाठी कोटगुल येथे 33 के.वि. चे सबस्टेशन महाविकास आघाडीने मंजुर केलेले होते. परंतु शिंदे व फडणवीस सरकारने त्या कामांना स्थगिती दिल्यामुळे ते काम सुरु होवू शकले नाही अशी टिकाही शिंदे, फडणवीस सरकारवर करण्यात आली. वास्तविक पाहता सद्याचे मुख्यमंत्री हेच गडचिरोली जिहयाचे पालकमंत्री होते. त्यामुळे गडचिरोली जिल्हयातील विकासाच्या मंजुर कामांना स्थगिती देण्यापुर्वी विचार करायला पाहिजे होते. परंतु सद्याच्या स्थगिती सरकारने गडचिरोली जिल्हयातील मंजुर झालेल्या विकास कामांना स्थगिती दिल्यामुळे विकास कामे खुटंलेली आहे. या कामावरील स्थगिती त्वरीत उठविण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा काॅग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, अशा इशाला देण्यात आला. कब्बडी खेळामुळे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहातेआयोजकांनी यापुढे देखील अशाच विविध स्पर्धांचे आयोजन करावे जेणेकरून युवावर्गाला आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. व ग्रामीण भागातील युवक युवती शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात करीयर बनवण्याचे प्रयत्न करतील. असे आव्हान प्रदेशाध्यक्ष आदिवासी विभाग तथा माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांनी केले आहे.
उद्घाटन स्थानावरुन बोलतांना आमदार इंदरशहा मडावी यांनी असे म्हटले की, छतीसगड राज्याची निर्मीती महाराष्ट्रा नंतर होवून सुध्दा सिमा भागातील विकास कामे छत्तीसगड चे मुख्यमंत्री श्री भुपेश बघेल यांच्या नेतृत्वात झपाटयाने सुरु आहेत. मागासलेला छत्तीसगड राज्य हाच प्रगती पथावर असून प्रगत महाराष्ट्र राज्यच मात्र गडचिरोली जिल्हयाच्या विकासाकडे दुर्लक्ष होण्याचे चित्र दिसून येते. देशातील महागाई, बेरोजगारी व वाढत चाललेली जाती धर्मातील व्देष भावना देशहिताच्या विरोधी असून जागृक जनतेने सत्यतेसाठी कटु कारस्थान रचणा-या भाजप सरकारला धडा शिकवण्याचाी गरज आहे असे आमदार तथा संसदीय सचीव श्री. इंदरशहा मडावी यांनी म्हंटले आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना नानाभाऊ नाकाडे म्हणाले कि.जिल्ह्यातील विकासकामे महाविकास आघाडी सरकारने मंजूर केले होते. परंतु शिंदे फडणवीस यांच्यास भारतीय जनता पक्षाचे आमदार खासदार असतानां सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील विकासमांना स्थागिती देत असल्याने लोकप्रतिनिधी कूचकामी ठरलेले आहे. यावेळी कोरची तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मनोज अग्रवाल, छत्तीसगड राज्याचे संजय जैन,लखगणुराम कार्यपाल, दिनेशशहा मांडवी, लच्छु सावले, अभिमन्यू मडावी, सुजाण पुराम , श्रीमती उमाताई पटेल,नारद कातलाम, भालचंद्र कोरेटी,मीनाताई माली, अब्दुल खालिक, राजेश नैताम, परमेश्वर लोहबरे,माजी.प.स. सदस्य मारगायेंजी, गुलफिगारजी, आतलांमजी, पत्रकार वैरागडेजी, ईश्वर कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, उत्तम कोरेटी, धनंजय ताटपलन,भुवन मुलेटी, पंकज बघवा, दयाराम पढरे, हिरा आडूलवार, अर्जुन कोरेटी, पन्नालाल फुलारे, विनोदकुमार कोरेटी, पूरणशाह कोरेटी, आदी बहुसंख्येने युवक युवती महिला ग्रामवासी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here