Home रत्नागिरी संत साहित्याचे अभ्यासक व भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन

संत साहित्याचे अभ्यासक व भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220927-WA0022.jpg

संत साहित्याचे अभ्यासक व भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन                                     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे अभ्यासक, मराठी लेखक, संशोधक, प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुण्यात निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षांचे होते. सोमवारी सायंकाळी घरत पूजा करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज (मंगळवार) सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

डॉ. रामचंद्र देखणे हे उत्तम वक्ते होते. त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली. देशविदेशांत त्यांनी हजारो कार्यक्रम केले होते. १४ मे २०१९ रोजी त्यांनी २१०० व्या भारुडाचा कार्यक्रम केला होता. ’दादला नको गं बाई’ व, ’नणदेचं कार्टं किरकिर करतंय’ आदि प्रतीकांतील त्यांची भारुडे विशेष लोकप्रिय झाली होती. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

घटस्थापनेमुळे डॉ. देखणे हे शनिवार पेठेतील घरीच होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Previous articleऐन दसरा, दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात जिल्ह्यातील अनेक गोदामात स्वस्त धान्यातील योजना पडल्या अपुऱ्या
Next articleनैसर्गिक शेती आणि वास्तव जाणून घेऊ या लेखातुन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here