Home पालघर भिंबरपाडा येथील सौर ऊर्जेवरील नळ योजना बंद : ग्रामपंचायत, पाणी पुरवठा विभाग...

भिंबरपाडा येथील सौर ऊर्जेवरील नळ योजना बंद : ग्रामपंचायत, पाणी पुरवठा विभाग बघण्याच्या भुमिकेत

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220918-WA0027.jpg

भिंबरपाडा येथील सौर ऊर्जेवरील नळ योजना बंद : ग्रामपंचायत, पाणी पुरवठा विभाग बघण्याच्या भुमिकेत

विक्रमगड,(वैभव पाटील): तालुक्यातील मोह बु. ग्रामपंचायत अंतर्गत भिंबरपाडा येथील सौर ऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना ५ महिन्यापासून बंद असून ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा विभाग फक्त बघण्याच्या भुमिकेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पाणी पुरवठ्याच्या योजना राबविल्या जातात. मात्र त्या नादुरुस्त झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
भिंबरपाडा येथील लोक वस्तीचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एका बोअरवेलमध्ये मोटार बसवून सौर ऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे, मात्र या योजनेद्वारे फक्त काही थोडे दिवस पाणी जनतेला मिळाले, मे महिन्यात ही नळ योजनेतील मोटार बंद झाली, आज जवळपास ५ महिने झाले आहेत, यासंदर्भात वारंवार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कळवूनही या योजनेकडे ग्रामपंचायतीचे लक्ष जात नाही. ग्रामपंचायती व पाणीपुरवठा विभागाने ही सौर ऊर्जेवरील नळ पाणीपुरवठा योजना लवकरच दुरूस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

Previous articleबांबू क्षेत्राच्‍या विकासासाठी राज्‍य सरकार प्रयत्‍नरत – वायएलपी राव जागतिक बांबू दिनानिम‍ित्‍त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
Next articleयंदाची दिवाळी साजरी करावी लागणार पावसाळ्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here