Home नाशिक नांदगाव बाजार समितीमध्ये मका आवक सुरू

नांदगाव बाजार समितीमध्ये मका आवक सुरू

181

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0026.jpg

नांदगाव बाजार समितीमध्ये मका आवक सुरू
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये चालू हंगामातील आवक सुरू झाली असून आज ओली मका शेतमालाचा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी लिलावासाठी चालू हंगामात नांदगाव यार्डवर विक्रीस आणणाऱ्या मका शेतमालधारक वेहेळगाव येथील शेतकरी अनिल बबन सानप यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. चार ट्रॅक्टर ओली मका आवक झाली होती. आनंद ट्रेडिंग कंपनी यांनी तो खरेदी केला. बाजारभाव दर 1900 ते 1925 निघाले. यावेळी लेखापाल भाऊसाहेब आगवन , बाबासाहेब साठे , सुरेश खैरनार , सुनिल पवार , लहू बोरसे , व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पारख , भास्कर कासार आनंद चोरडिया , सोमनाथ घोंगाणे ,संजय करवा, ज्ञानेश्वर वाघ , अभिजीत कासलीवाल, दीपक कासलीवाल, समीर कासलीवाल , गबू अग्रवाल. सुमेर कासलीवाल आदिसह शेतकरी, व्यापारी बांधव उपस्थित होते.

Previous articleसमाज सेविका अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते रुग्ण वाहिनी चे उद्घाटन।
Next articleकळवण तालुक्यात सरपंच पदासाठी 108 तर सदस्य पदासाठी 379 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.