Home रत्नागिरी सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जाधव यांचं निधन

सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जाधव यांचं निधन

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0054.jpg

सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जाधव यांचं निधन          रत्नागिरी,(सुनील धावडे)

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना आपलं वेगळंपण जपून ठेवणारे असे,पाचल परिसरातील प्रचलित असणारे नंदकुमार जाधव सर यांचं नुकतेच मुंबई येथे आकस्मित निधन झालं या निधनाने परिसरात सर्वत्र हळवळ व्यक्त होत आहे.

नंदकुमार जाधव सर यांनी पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर या हायस्कूलला शिक्षक म्हणून बरीच वर्ष काम केलं होतं. दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्ती होऊन सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची कामगिरी पाहायला मिळत होती.सध्या ते राजापूर तालुका बौद्धजन संघ, गट क्रमांक 3 चे, तसेच पाचल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेचे खजिनदार म्हणून कार्यरत होते. हरळ बौद्ध विकास मंडळाच्या सचिव पदाची धुरा देखील ते यशस्वीरित्या सांभाळत होते.
सध्या एका छोट्याशा आजाराशी झगडत असतानाही समाजात वावरताना त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य कधी कमी झालं न्हवतं.या महिन्याच्या 18 तारीख ला मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाच्या झटका आला व त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाला.

आज 27 ऑगस्ट रोजी त्यांचा पुण्यानुमोदन संस्कारविधी व शोकसभेचा कार्यक्रम बौद्ध धम्म संस्कार पद्धतीने त्यांच्या गावं हरळ येथील राहत्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी व तीन मुलं असा परिवार असून समाज्यात वावरताना त्यांनी त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे खूप मोठा मित्रपरिवार जोडून ठेवला आहे.

Previous articleबँक ऑफ इंडिया हि देशातील अग्रगण्य बँक बनविण्याचे ध्येय जोपसा : शामकांत हुटा
Next articleजिल्हा कुस्ती असोसिएशनकडून निपुण लांजेकर यांचा सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here