Home गडचिरोली सांघिक एकतेच्या भावनेतून खेळाचे प्रदर्शन केल्यास विजय पक्का आमदार डॉ देवरावजी होळी

सांघिक एकतेच्या भावनेतून खेळाचे प्रदर्शन केल्यास विजय पक्का आमदार डॉ देवरावजी होळी

105

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0069.jpg

सांघिक एकतेच्या भावनेतून खेळाचे प्रदर्शन केल्यास विजय पक्का

आमदार डॉ देवरावजी होळी                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जयनगर येथील नेताजी फुटबॉल प्रतियोगितेला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची सदिच्छा भेट

खेळाडूंची भेट घेत वाढविले क्रीडा क्रीडापटूंचे मनोबल

जयनगर (७९)येथे सुरू असलेल्या द्वितीय नेताजी फुटबॉल प्रतियोगितेला आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंची संवाद साधला. सांघिक भावनेतून एकतेची भावना निर्माण होऊन त्यातून सहज विजय शक्य होतो त्यामुळे सर्वांनी सांघिक भावनेतून खेळाचे प्रदर्शन करावे असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित क्रीडापटूंचे त्यांनी स्वागत केले त्यांची भेट घेत त्यांचे मनोबल उंचावले.

यावेळी जयनगर येथील नील रतन मंडल, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू हरण ढाली ,कृष्ण मंडल, प्रितेश मंडल, अपूर्व वैद्य ,अनुप गाईन, जिवन विश्वास , विनय विश्वास,जय हिंद युवा कृषी बचत गटाचे सदस्य , नितीश मंडल , देवकुमार मंडल, किशोर साना, मृणाल हलदर, राजेन मंडल, हेमंत साना ,विजय विश्वास, सरोजित मंडल ,मिथुन विश्वास ,रवींद्र मंडल प्रामुख्यानं उपस्थित होते.

यावेळी त्यांनी क्रिडा उपस्थित क्रीडापटूंची संवाद साधला व खेळाडूंनी सांघिक भावनेतून खेळाचे प्रदर्शन करावे तर उपस्थित प्रेक्षक गावकऱ्यांनी या स्पर्धेचा त्यातून आनंद घ्यावा असे आवाहन केले.

Previous articleजि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी बैल जोडीची विधिवत पूजा करून घेतले आशीर्वाद..!!
Next articleसांगवी येथील इंदीरा गांधी रुग्णालयात भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.