Home नांदेड मुक्रमाबाद येथे गणेश उत्सव २०२२ शांतता समितीची मीटिंग संपन्न.

मुक्रमाबाद येथे गणेश उत्सव २०२२ शांतता समितीची मीटिंग संपन्न.

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0012.jpg

मुक्रमाबाद येथे गणेश उत्सव २०२२
शांतता समितीची मीटिंग संपन्न.

प्रतिनिधी मु्क्रमाबाद
बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

मुक्रमाबाद येथे गणेश उत्सव २०२२ नीमीत्त मुक्रमाबाद पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक २५.०८.२०२२ रोजी सकाळी ठीक ११.३० वा पोलीस ठाणे मुक्रमाबाद पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची मीटिंग आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते मा सुभाष अप्पा बोधने,मुक्रमाबाद ग्रामपंचायत चे सरपंच प्रतिनिधी बालाजी अप्पा बोधने, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.खेंगटे साहेब, माजी उपसरपंच तमप्पा गंदिगुडे, युवा नेते दिनेश अप्पा आवडके, उपसरपंच सदाशिव बोयेवार, मुक्रमाबादचे मंडळ अधिकारी मुंडे साहेब मुक्रमाबाद शहर व परिसरातील सर्व सरपंच/उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सर्व आजी / माजी तंटामुक्ती अध्यक्ष , आजी / माजी सरपंच उपसरपंच , शांतता समिती सदस्य , पत्रकार बांधव , व्यापारी बंधू , डॉक्टर , इंजिनियर , सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी , महिला दक्षता समिती चे सदस्य , पोलीस पाटिल , तंटामुक्ति अध्यक्ष , सरपंच , उपसरपंच , प्रतिष्ठित नागरिक सदर बैठकीत उपस्थित होते त्यावेळी मुक्रमाबाद चे ग्रामपंचायत सदस्य सरपंच प्रतिनिधी बालाजी अप्पा बोधने, उपसरपंच सदाशिव बोयेवार, शेतकरी संघटनेचे नेते शिवशंकर पाटील कलबंरकर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बालाजी अप्पा पसरगे, बालाजी पाटील सांगवीकर,या तंटामुक्ती अध्यक्ष गौसखाॅ पठाण, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व गणेश भक्तांना गणेश उत्सव स्पर्धा योग्य पध्दतीने साजरा करण्यात यावेत असे गणेश भक्तांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पोलीस स्टेशन चे API संग्राम जाधव साहेब यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश दिले व गणेश उत्सवाबद्दल सर्व गणेश भक्तांना मार्गदर्शन केले गणेश उत्सवाबद्दल नियमावली व वीसर्जन बाबत सर्व गणेश भक्तांना सूचना दिल्या.पोलीस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे प्रथम, द्वितीय,त्रतीय येनार्यास बक्षीस जाहीर केले.तसेच मुक्रमाबाद नगरीचे माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य कै.स्व.शिवराज अप्पा आवडके यांच्या स्मरणार्थ अप्पा प्रतिष्ठान चे अध्यक्ष काॅग्रेस चे युवा नेते दिनेश अप्पा आवडके यांनी १११११/-प्रथम पारीतोषीक व द्वितीय पारितोषिक ५५५५/-असे जाहीर करण्यात आले. त्यावेळी या बैठकीचे आयोजन PSl गजानन कांगणे साहेब , PSI गोपीनाथ वाघमारे साहेब,ईबीतवार साहेब, पठाण साहेब.व सुत्रसंचालन पत्रकार रज्जाक कुरेशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here