Home गडचिरोली जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांची शहीद बाबुराव शेडमाके माध्य. विद्यालयात...

जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांची शहीद बाबुराव शेडमाके माध्य. विद्यालयात सदिच्छा भेट व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण.

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0061.jpg

जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांची शहीद बाबुराव शेडमाके माध्य. विद्यालयात सदिच्छा भेट व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण.

चामोर्शी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)://  शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त युवा सामजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी चामोर्शी तालुक्यातील आमगाव (म.) येथील शहीद बाबूराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आणि जि.प. उच्च प्राथ. केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर हितगुज करून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या संदर्भाने मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अनुप कोहळे म्हणाले येणारा काळ हा स्पर्धेचा आहे त्यामुळे अभ्यासासोबतच क्रीडा, वतृत्व, लिखाण सारख्या विविध कला प्रत्येक विद्यार्त्यांनी आत्मसात करून स्वतःचा व्यक्तिमत्व तयार करावा तेव्हाच आपण या स्पर्धेच्या युगात स्वतःचा अस्तित्व निर्माण करू शकू.
याप्रसंगी श.बा. शेडमाके माध्य.विद्यालयाचे प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक अहिलावार, सुनील वांढरे, पुरुषोत्तम गुरुनुले, सुवेंदु मंडल, नरेंद्र चिटमलवार, अनिल निमजे, किशोर पोहनकर, चंदू सातपुते, सुरेश केळझरकर, रुचिता बंडावार, कविता पुण्यपकर, निशा रामगुंडे, श्रुती मोतकुरवार तसेच लीलाधर दुधबळे, तिरुपती बहिरवार, रतन सिकदर, सुरज मुनगेलवार, युवा सामजिक कार्यकर्ते राजू सोमनकर, आशिष भांडेकर आधी उपस्थित होते .

Previous articleगडचिरोली शहरात पुन्हा एक मानाचा तुरा.–माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे कारगील चौकातील स्मारकाचे सौन्दयीकरण
Next articleगडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचे संशोधन करण्याची आवश्यकता
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here