Home रत्नागिरी जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता

जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0018.jpg

जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता                     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता शाश्वत मानकर ठरला आहे. तर बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी याचा गौरव करण्यात आला. उगवता तारा पुरस्कार मंडणगड येथील मोहसीन गफार सय्यद याला देण्यात आला.

14 ऑगस्ट 2022 रोजी ‘राधाकृष्ण श्री 2022’ जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा राधाकृष्ण मंदिर, रत्नागिरी येथे पार पडली. राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद वणजू, विश्वस्त वसंत भिंगार्डे, राजेश रेडीज, हेमंत वणजू, जान्हवी पाटील, सदानंद जोशी, सौरभ मलुष्टे उपस्थित होते.

चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या गटात अमर लटके चिपळूण याचा प्रथम क्रमांक आला तर, ओंकार कांगणे दापोली याचा दुसरा, महेश आंबेकर रत्नागिरी तृतीय, मोहित गुजर देवरुख चौथा आणि राजेंद्र मोदक याचा पाचवा क्रमांक आला. दुसऱ्या गटात शाश्वत मानकर रत्नागिरी प्रथम, हर्षद मांडवकर राजापूर दुसरा, वैभव मेस्त्री रत्नागिरी तिसरा, आकाश वाजे चिपळूण चौथा आणि रणजित भुवड चिपळूण याचा पाचवा क्रमांक आला.

तिसऱ्या गटात वैभव देवरुखकर चिपळूण पहिला, संजय डेरवणकर सावर्डे दुसरा, गणेश गोसावी सावर्डे तिसरा, नितेश रसाळ खेड चौथा आणि संकेत फागे याचा पाचवा क्रमांक आला. चौथ्या गटात अजिंक्य कदम राजापूर प्रथम क्रमांक, स्वप्नील तळेकर रत्नागिरी दुसरा, सागर सपटे मंडणगड तिसरा, सुदर्शन पाटील चौथा तर सनम इंगावले खेड याचा पाचवा क्रमांक आला.

शाश्वत मानकर राधाकृष्ण श्री 2022 किताब विजेता ठरला. बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी रत्नागिरी आणि उगवता तारा म्हणून मोहसीन गफार सय्यद – न्यू गोल्ड जिम, मंडणगड यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस वितरण वेळी ‘राधाकृष्ण श्री’ किताब विजेता शाश्वत मानकर याला मानाचा पट्टा व रोख पारितोषिक सुधीर वणजू व अभिज्ञ वणजू (छाया उद्योग समुह) यांच्या हस्ते देण्यात आले व आकर्षक शिल्ड ज्येष्ठ उद्योज प्रविण मलुष्टे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, मकरंद खातू, सौरभ मलुष्टे, कुणाल खातू, मुकूल मलुष्टे, सुनील बोडखळे, सचिन केसरकर, मनोहर दळी, गौतम पाष्टे, ऋषी धुुंदूर, नरेंद्र वणजू, सदानंद जोशी, शैलेश जाधव, जितेंद्र नाचणकर, पाटील सर, नंदकुमार शिंदे, हेमंत जाधव उपस्थित होते.

Previous articleन्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत उत्कर्ष मित्र मंडळ सैतवडे बनवाडी तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
Next articleहर घर तिरंगा अंतर्गत नाखरे प्रशालेत विविध स्पर्धा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here