Home गडचिरोली ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राअतंर्गत वाघाच्या दहशतीची खा.अशोकजी नेते यांनी घेतली दखल

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राअतंर्गत वाघाच्या दहशतीची खा.अशोकजी नेते यांनी घेतली दखल

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0085.jpg

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राअतंर्गत वाघाच्या दहशतीची खा.अशोकजी नेते यांनी घेतली दखल

ब्रम्हपुरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :-

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्राअतंर्गत वाघाची दहशत असून एकाच दिवशी दोन विविध घटना घडल्याची माहिती माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी खा.अशोकजी नेते यांना दिली असता तत्काळ याची दखल घेऊन ब्रम्हपुरी वनविभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी( DFO)दीपेश मल्होत्रा यांची तातडीने भेट घेऊन त्यांना झालेल्या घटना विषयी सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली आणि त्यांना सक्त निर्देश दिले.संबंधित घटनेवर हयगय करू नये अशी ताकीद दिली. शासन स्तरावर जे काही मदत लागेलं ते आपण करुया व त्या व्यतिरिक्त इतर काही मदत लागेल त्या करीता केंद्र सरकार तथा आपले महाराष्ट्र राज्याचे वनेमंत्री मा.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबत बोलून जे काही मदत करता येईल ते आपण तातडीने करू या प्रसंगी मा.खा.अशोक नेते यांनी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे सम्बधित
प्रभाकर मडावी रा.पदमापुर (भुज) येथील जखमी इसमाची तसेच मृत्यु
पावलेले मुखरू पैकु राऊत या दोन
पीडितांच्या नातेवाईकाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल.
याप्रसंगी मा.खा.अशोकजी नेते,माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा अविनाश पाल,नागराज गेडाम माजी सभापती,मनोज वेटे नगरसेवक,मनोज भुपाल,त्तनय देशकर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,रीतेश अलमस्त माजी.पं स. सेलोटकर सर,साकेतभानारकर,सुयोग बाळबुधे,राऊतसर माजी सभापती तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here