
आशाताई बच्छाव
पंचायत समिती समोर बसलेले उपोषण कर्ते अचानक गायब,तालुकभर एकच खळबळ…!
युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी रवि शिरस्कार,संग्रामपूर
14 ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथील संतोष गाळकर यांचे संग्रामपूर पंचायत समिती कार्यालय समोर चार चाकी वाहनात उपोषण सुरू केले होते , आज 16 ऑगस्ट रोजी या वाहनात बसलेला उपोषण कर्ता अचानक उपोषण स्थळावरून गायब झाल्याने तालुकाभर खळबळ माजली आहे आज सकाळी नऊ वाजता सुमारास माहिती समजली आहे. ,उपोषण हे चार चाकी वाहनात सुरू होते,त्यांच्या गाडीत कपडे चप्पल आणि कागदपत्रे जागेवरच पडून असलेले दिसले उपोषण कर्ते कुठे गायब झाले असा प्रश्न उपस्थित लोकांना पडला असुन याबाबत अनेक तर्क वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत उपस्थित लोकांनी शोधाशोध घेतला ,याबाबत नागरिकांची पाहण्यासाठी भरपूर गर्दी होत आहे. उपोषण कर्त्या यांचा मुलगा सुपेश संतोष गाळकर याच्या सह अनेक जमावतील लोकांनी या विषयावर तामगाव पोलिसाना कळविले असता त्यांनी याबत मिसिंग चा रिपोर्ट घेण्यात आला असून पुढील तपास लवकरच करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक उलमाले यांनी दिली आहे
उपोषण कर्ते कुठं गायब झाले यावर लोकांचे लक्ष वेधले आहे