आशाताई बच्छाव
पिंगळवाडे तील प्रत्येक घर सजले तिरंगा ध्वजाने
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे अवचित्याने संपूर्ण भारत भर हा उत्सव साजरा होत आहे . याच अनुषंगाने पिंगळवाडे गावात सुद्धा हर घर तिरंगा दिसत आहेत. साधारण हजाराच्या पुढे लोक वस्ती असलेल्या पिंगळवाडे गावात प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकत आहे. तसेच नागरिक सुद्धा या तिरंगा ध्वजाचे सन्मान पूर्वक जतन करत आहेत. विशेष बाब म्हणजे पिंगळवाडे गावातील बहुतांशी नागरिक मळ्यात किंवा वाडी वस्त्यांवर वास्तव्यास आहेत तरी सुद्धा राष्ट्रप्रेमाचे प्रतीक राष्ट्रध्वज आप आपल्या राहत्या घरी मोठ्या डौलाने नागरिकांनी लावले आहेत. ग्रामपंचायत मार्फत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना सुद्धा ग्रामपंचायत यांच्यामार्फत आव्हान केले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा प्रांगणात सुद्धा ठीक ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात आले आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हर घर तिरंगा दिसत आहेत. त्यात ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, तलाठी कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी, आणि या सर्व कार्यालयांच्या ध्वजांचे काळजी व सांभाळ संबंधित कर्मचारी करत आहेत तसेच गावातील नागरिक या अमृत महोत्सवाचे जल्लोष साजरा करत आहेत