Home रत्नागिरी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात ग्रंथप्रदर्शन उपक्रम

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात ग्रंथप्रदर्शन उपक्रम

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0050.jpg

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात ग्रंथप्रदर्शन उपक्रम

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) तालुक्यातील मालगुंड येथील केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय समितीच्यावतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन उपक्रम नुकताच राबविण्यात आला. यावेळी मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रविंद्र मेहेंदळे व कोमसाप, शाखा- मालगुंडचे सचिव विलास राणे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याचवेळी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर याच जयंतीचे औचित्य साधून आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वाचनालयात सामूहिक राष्ट्रगीताचे गायन उपस्थित सर्वाच्यावतीने करण्यात आले.

या जयंती दिनानिमित्त ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ग्रंथालय प्रदर्शनामध्ये वाचनालयाचे ग्रंथपाल स्वप्नेश राजवाडकर यांनी प्रदर्शनातील विविध ग्रंथांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व ग्रंथप्रेमीनी ग्रंथप्रदर्शनाची पाहणी करुन वाचनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाचनालयाचे लिपीक साईकुमार डांगे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी केशवसुत स्मारक सार्व. वाचनालयाचे ग्रंथपाल स्वप्नेश राजवाडकर यांचे समवेत स्मारक कर्मचारी साईकुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी व स्पृहा लिंगायत यांनी विशेष मेहेनत घेतली.

Previous articleपाऊस आकाशीचा आणि देशभक्तीचा 100 फूटी ध्वजस्तंभावर शानदार ध्वजारोहण
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाळा चाफे नं 1 येथे भरले पर्ण प्रदर्शन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here