Home गडचिरोली अहेरी तालुक्यातील अनेक गावांना जूनपासून धान्याचा पुरवठा नाही..!! रास्तभाव दुकानांमध्ये धान्य पोहोचले...

अहेरी तालुक्यातील अनेक गावांना जूनपासून धान्याचा पुरवठा नाही..!! रास्तभाव दुकानांमध्ये धान्य पोहोचले नाही..!!

101

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0068.jpg

अहेरी तालुक्यातील अनेक गावांना जूनपासून धान्याचा पुरवठा नाही..!!

रास्तभाव दुकानांमध्ये धान्य पोहोचले नाही..!!

तात्काळ धान्याची पुरवठा करा अन्यथा तीव्र आंदोलन : माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार..!!                                                 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा रास्त भावाने धान्य वितरित करण्यासाठी दरमहा २५ तारखेपर्यंत रास्तभाव दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा होणे आवश्यक असताना, अहेरी तालुक्यातील अनेक रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही त्यामुळे रास्तभाव दुकानांमार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण रखडले असून, धान्याचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत शिधापत्रिकाधारक लाभार्थींकडून प्रतीक्षा केली जात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना दरमहा गहू, तांदूळ, साखर, तूर डाळ, हरभरा डाळ इत्यादी धान्याचे वितरण करण्यात येते.मात्र मागील जून महिन्यापासून अहेरी तालुक्यातील भंगारामपेठा, गोंविंदगाव, मेडपल्ली कोठारी, चंद्रा, कोरली, देवलमरी, अबनपल्ली, रेपनपल्ली, ताटिगुदम, गुंडेरा, रसपल्ली, आलदंडी, मोदुम्तूरा, उमानूर, पुसूकपल्ली, जिमलगट्टा, अर्कापल्ली, मेडपल्ली वेलादी, गडबामणी, चेरपल्ली, व्यंकटारावपेठ, दामरंचा, सन्ड्रा, पेरमिली, सुद्धागुदम, या गावांना धान्याची पुरवठा झालेली नसून प्रशासनाने तात्काळ धान्याची पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि . प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे.