Home रत्नागिरी घरोघरी तिरंगा जनजागृती अभियान

घरोघरी तिरंगा जनजागृती अभियान

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0048.jpg

घरोघरी तिरंगा जनजागृती अभियान

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत जनजागृती संघाच्या वतीने आज रा. भा. शिर्के प्रशाला आणि अ. के. देसाई हायस्कूल याठिकाणी घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना आवाहन करताना आणि संहितेबद्दल माहिती जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट, राजेश आयरे, राकेश नलावडे आणि कौस्तुभ सावंत यांनी माहिती दिली.

जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने सायकल रॅलीसुद्धा यशस्वीपणे आयोजित केली. तसेच आता शाळाशाळांमध्ये तिरंग्याविषयी माहिती देऊन जनजागरण करण्यात येत आहे. पुढील टप्प्यावर महत्त्वाच्या नाक्यांवर देशभक्तीपर गीते ध्वनिक्षेपकांवरून वाजवण्यात येणार आहेत.

येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान, प्रत्येक घरावर तिरंग फडकणार आहे. त्यामुळे या कालावधीत तिरंगा फडकावण्यासंदर्भातील माहिती लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती संघ करत आहे. याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जनजागृती संघाचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here