Home कोल्हापूर रमेश शिंपणेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

रमेश शिंपणेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0069.jpg

रमेश शिंपणेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

पेठ वडगाव राहुल शिंदे : रमेश शिंपणेकर यांनी पेठ वडगाव मधील आश्रम शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना अन्नधान्य व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील आश्रम शाळेमध्ये रमेश सायकल स्पेअर पार्टचे संस्थापक यांनी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना अन्नधान्य व शालेय शिक्षणाचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळेस ते म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिक्षण घ्या आणि मोठे व्हा.तसेच शिंपणेकर यांनी वाढदिवसानिमित्त योग सेवा फाउंडेशन च्या झाडांची भिशी उपक्रमात सहभाग घेतला. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिरात भरीव मदत केली. व दुकान मधील सर्व कामगारांना बाहेरील लोकांना धान्य वाटप केले. वह्या वाटप केल्या. संध्याकाळी मारुती मंदिर मध्ये महाआरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आले. समाजातील व राजकीय मंडळी व सामाजिक लोकांनी वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद देऊन सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here