Home नांदेड नायगाव तालुक्यात ढगफुटी, सायंकाळच्या सुमारास बरसला धो पाऊस.

नायगाव तालुक्यात ढगफुटी, सायंकाळच्या सुमारास बरसला धो पाऊस.

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0046.jpg

नायगाव तालुक्यात ढगफुटी,
सायंकाळच्या सुमारास बरसला धो पाऊस.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

झाडाला अडकलेला देगाव येथील शेतकरी बचावला

नायगाव तालुक्यातील परिसरात सायंकाळीं मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला. पूर परिस्थिती आल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला असून देगाव येथील शेतकऱ्याचे चार जनावरे वाहून गेली असल्याचे तहसील कार्यालया मार्फत कळवण्यात आले आहे.

सायकाळी साडेतीन च्या दरम्यान पावसाने परिसरात रौद्र रूप धारण केले बघता बघता सगळीकडे पाणीच पाणी झाले. नदी ना पूर आला. तालुक्यातील पळस गाव, टाकळगाव, ताकबीड, देगाव आदी गावांचा संपर्क तुटला. नाल्यानी रौद्र रूप धारण केल्याने शाळकरी मुले गावाकडे जायची अडकून पडली. या परिसरात नागरिकांनी शासनाकडे पुल बाधून देण्याची मागणी केली

देगाव येथील शेतकरी व्यंकट मोरे हे वाहून जात असताना झाडाचा आधार घेऊन झाडावर थांबले त्यावेळी गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढले त्यामुळे जीवितहानी टळली असली तरी त्या शेतकऱ्याचे चार जनावरे पुरात वाहून गेले असल्याचे तहसील कार्यालया मार्फत सांगण्यात आले. शेतकऱ्यांने गवकर्याचे आभार मानले व सुटकेचा निःश्वास सोडला.
तालुक्यात झालेल्या ढग फुटी पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तर पळस गाव येथील शेतकरी जुंने यांच्या घराभोवती पाण्याने वेढा दिला असल्याने संसार उपयोगी साहित्य पाण्यात गेले आहे. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.
आपत्ती व्यवस्थापन बघ्याच्या भूमिकेत.

देगाव येथील शेतकरी वाहून जाऊन झाडावर बसला त्याची खबर तहसील कार्यालयाला देण्यात आली मात्र अर्ध्या तासाने मंडळ अधिकाऱ्याचे पथक आले खरे मात्र त्यांच्याकडे कुठलेच साहित्य नसल्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली त्यावेळेस गावकऱ्यांनी तत्परता दाखवून ट्रॅक्टर ला दोरी बांधून शेतकऱ्याची सुटका केली. जवळ पास पाऊण तास अडकलेला शेतकऱ्यानी सुटकेचा निःश्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here