Home नांदेड सुधागड हायस्कूल पोयंजे ता,पनवेल.जि.रायगड.शाळेचा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा संपन्न.

सुधागड हायस्कूल पोयंजे ता,पनवेल.जि.रायगड.शाळेचा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा संपन्न.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0052.jpg

सुधागड हायस्कूल पोयंजे ता,पनवेल.जि.रायगड.शाळेचा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा संपन्न.

३० वर्षे यशाची,उज्ज्वल पंरपरेची,विकासाची,आणि गुणवत्तेची…
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर:सु.ए.सो.चे, माध्यमिक विद्यामंदिर पोयंजे ता. पनवेल – जि.रायगड.या शाळेला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शाळेनी’ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी’ स्थानिक स्कुल कमेटी अध्यक्ष – श्री. गोविंद पाटील तसेच गुपग्राम पंचायत पोयंजे सदस्य – श्री. रोहिदास चोरघे व विद्यालयाचे मुख्याध्यापक ठाकरे एल. एल.व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. म्हाञे सी.जे. सर व विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व शिक्षणमहर्षी संस्थापक कै. दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत ७वीच्या विदयार्थ्यांनी सादर केले.व विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात सर्व वर्गातील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे. सुत्रसंचलन श्री. म्हात्रे सर व शाळेचा अहवाल वाचन श्रीम.शिंदे मॅडमनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. वाघमारे सरांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंदांनी व विदयार्थ्यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here