Home गडचिरोली मनसे पदाधिकाऱ्यांचा गडचिरोली दौरा संपन्न

मनसे पदाधिकाऱ्यांचा गडचिरोली दौरा संपन्न

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220728-WA0057.jpg

मनसे पदाधिकाऱ्यांचा गडचिरोली दौरा संपन्न

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती, चातगाव येथे सर्च च्या माध्यमातून होत असलेली कामे, गडचिरोलीत होत असलेल्या अवैध कामावर रोख,गडचिरोली शहरात व आरमोरी शहरात मनसेची बैठक ही सर्व वैशिष्ट्ये होती मनसे पदाधिकाऱ्यांच्या गडचिरोली च्या आजच्या एक दिवसीय दौऱ्याची, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी गडचिरोली व आरमोरी येथे पूर परिस्थिती ची पाहणी करून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांचेशी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात चर्चा करून पुढील निर्देश देऊन कार्यक्रमाची रूपरेखा ठरविली तसेच शोधग्राम येथे जाऊन सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ अभय बंग व आनंद बंग यांची भेट घेतली,सर्च तर्फे आयोजित आरोग्य कॅम्प ची माहिती घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील अवैध गोष्टीवर आळा बसावा यासाठी बैठक घेतली, आरमोरी शहरातील उपजिल्हा अध्यक्ष रणजित बनकर यांचे कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणूकीच्या दृष्टीने उपस्थित महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला,या संपूर्ण दौऱ्यात हेमंत गडकरी यांच्या सह नागपूरचे शहर अध्यक्ष अजय ढोके,विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे,विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साळवे,उपजिल्हा अध्यक्ष रणजित बनकर,मनविसे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील वाढई,तालुका अध्यक्ष हरीश वलादे,हर्षल बोरकुटे,ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष सूरज शेंडे, आरमोरी येथील कार्यक्रमात रणजित बनकर,महिला सेना तालुका अध्यक्ष सौ विभाताई बोबाटे,ज्योती बगमारे,महानंदा शेंडे,उमा कोडापे ,तालुका अध्यक्ष राकेश सोंनकुसरे,तालुका उपाध्यक्ष रवी उसेंडी,संतोष प्रधान,किशोर जंजालकर ,मनविसे चे शेषराव सोंनकुसरे,वडसा तालुका उपाध्यक्ष अभय अवसरे,तालुका संघटक मुकेश दाणे व इतर उपस्थित होते,यावेळी आरमोरी शहरातील काही कलावंत यांचाही सत्कार हेमंत गडकरी व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here