Home सामाजिक मराठा मोर्चाची मागणी मंजूर शहाजी महाराज यांची समाधी सुशोभीकरणासाठी १० कोटी निधींची...

मराठा मोर्चाची मागणी मंजूर शहाजी महाराज यांची समाधी सुशोभीकरणासाठी १० कोटी निधींची मुख्यमंत्री श्रीमान् बसवराज बोम्माई यांची घोषणा

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0067.jpg

 

मराठा मोर्चाची मागणी मंजूर

शहाजी महाराज यांची समाधी सुशोभीकरणासाठी १० कोटी निधींची मुख्यमंत्री श्रीमान् बसवराज बोम्माई यांची घोषणा

गुलबर्गा जिल्हा प्रतिनिधी- श्री यशवंतराव आंबादासराव सूर्यवंशी –

दिनांक : २०-०७-२०२२ स्वराज्य संस्थापक शहाजी महाराज भोसले यांची समाधी स्थळाचे सुशोभीकरण करण्यासाठी कर्नाटक शासन निधीची काहीच कमतरता भासू देणार नाही व यासाठी शहाजी महाराज यांचे समाधी सुशोभीकरणसाठी १० कोटींचानिधी आज झालेल्या मराठा विकास निगम महामंडळाच्या बेंगलोर येथील कार्यक्रम लोकापर्ण सोहळ्यानिमित्त मराठा समाजाच्या विकास कार्यासाठी १०० कोटी मुख्यमंत्री श्रीमान बसवराज बोम्माई यांनी जाहीर केला. मराठा समाजाच्यावतीने त्यांना एक सविस्तर मागणी पत्र सादर करण्यात आले होते. या मागणी पत्रात मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक यांच्यावतीने महेश डोंगरे पाटील, जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, शरद उकवले पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत. या प्रसंगी विशेष उपस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री श्रीमान बी. एस. यडीयुरप्पा-माजी मुख्यमंत्री यांच्यासह बिदर जि.पं. माजी अध्यक्ष अनिल भुसारे आदी होते. आपल्या सविस्तर निवेदनात विशेष करून नमूद करण्यात आले होते की, कर्नाटकातील सध्याच्या चन्नगिरी मंडळाजवळ होद्देगिरी येथे असलेल्या स्वराज्याचे संकल्पक शहाजी राजे भोसले यांची समाधी असून त्याचे सुशोभीकरण्यासाठी कर्नाटक शासनाने पुढाकार घ्यावा असे नमूद करण्यात आले होते. मुख्यमंत्री श्रीमान बसवराज बोम्माई या प्रसंगी विशेष करून म्हणाले की, कर्नाटकात मराठा समाजास आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कुठले ही मोर्चा काढण्याची आवश्यकता भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सदरील • कार्यक्रमाला ५०,००० लोक उपस्थित होते.

तसेच कलबुरगि/ गुलबर्गा मराठा मडळाचे जिल्हाध्यक्ष श्रीमान आर. बी. जगदाळे, सूर्यकांत कदम, अनिल मोरे, राजेश माने, राजू काकडे, भीम वाघमारे, रवि सूर्यवंशी, यशवंत आ. सूर्यवंशी, दत्तू काळे-आळंद, अध्यक्ष-नागनाथ येटे, तसेच बिदर जिल्हा मराठा समाजाचे श्री सुभाष बिरादार, व्यंकट मींड्या, दत्तू जाधव, वसंत पाटी, वेंकट महाराज आदि मराठा नेतेमंडळी उपस्थित होते.

Previous articleदेशमुख समाजातील गूणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर देशमुख समाज जागृती मंडळ व देशमुख महिला मंडळ अकोला कौतूकाची थाप सत्कार व पुरस्कार वितरण
Next articleदोन वर्षिय चिमुकलीवर अत्याचार करुन आरोपी फरार।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here