Home Breaking News आष्टी पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

आष्टी पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी

44
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220720-WA0013.jpg

आष्टी पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

नवीन पूल पुढील वर्षापर्यंत सुरू होईल यासाठी करणार प्रयत्न

आष्टी येथील पुलाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली पाहणी

एकाच मागणीमध्ये आष्टीच्या नवीन पुलाचे बांधकाम मंजूर करणारे केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी, तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वित्तमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मानले आभार

दिनांक २० जुलै २०२२ गडचिरोली

महापुरामुळे आष्टी पुलावरील वाहतूक थांबविण्यात आल्याने असंख्य वाहने प्रवासी अडकून पडली असून सर्वसामान्य लोकांनाही त्या भागात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. सध्यस्थितीत पूर ओसरलेला असून पुलावर कोणत्याही प्रकारचे पाणी अथवा धोका नाही करिता हलक्या वाहनांसह जड वाहनांना देखील वाहतुकीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रशासनाला केली आहे

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या भागातील पूर परिस्थितीची पाहणी करताना आष्टी पुलाच्याही परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी चामोर्शीचे तहसीलदार नागटिळकजी,आष्टीचे पोलीस अधिकारी गावंडे साहेब, चामोशी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशजी शहा अनुसूचित जाती मोर्चाचे धर्मप्रकाशजी कुकुडकर, तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे आष्टीच्या सरपंच सौ.नंदाताई कुळसंगे प्रकाश भाऊ बोबाटे, रविभाऊ आंबटवार,कृषी अधिकारी परदेशी मॅडम,यांचे सह भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

दरवर्षी पुराच्या पावसामध्ये आष्टी येथील पूल बुडून जात असल्यानेच वाहतूकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे या परिसरातील वाहतूक व सर्वसामान्य लोकांनाही प्रवासासाठी मोठी अडचण निर्माण होत होती .त्याकरिता केंद्रीय परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी व तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वित्तमंत्री सुधीर भाऊ घंटीवार यांच्याकडे बल्लारपूर येथील एका बैठकीमध्ये आष्टी वैनगंगा नदीच्या पुलावर नवीन पूल मंजूर करण्यात यावे अशी मागणी केली असता त्यांनी त्याच ठिकाणी मंजुरीची घोषणा केली व वर्षा-दीड वर्षातच पुलाचे काम पिल्लर पर्यंत येईल इतक्या गतीने काम केले. त्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी भाजपाच्या या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. या नवीन पुलावरील वाहतूक पुढील वर्षापर्यंत कशी सुरू करता येईल यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आता पूरपरिस्थिती सुधारलेली असून सध्या स्थितीमध्ये पुलावर वाहतूक करण्यायोग्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुलावर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्याने सर्वसामान्य हलक्या वाहतुकी सोबतच जड वाहनांना देखील वाहतुकीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.

Previous articleआष्टी पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next article21 ला काँग्रेसचे सक्तवसुली संचनालय (ED) कार्यालय नागपूर येथे आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here