Home गडचिरोली राष्ट्रपतीपदासाठी श्रीमती द्रोपदी मुर्मु या सर्वसामान्य आदिवासी महिलेची निवड केल्याबद्दल भारतीय जनता...

राष्ट्रपतीपदासाठी श्रीमती द्रोपदी मुर्मु या सर्वसामान्य आदिवासी महिलेची निवड केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या अभिनंदनाचा ठराव आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शना

108

आशाताई बच्छाव

IMG-20220707-WA0017.jpg

राष्ट्रपतीपदासाठी श्रीमती द्रोपदी मुर्मु या सर्वसामान्य आदिवासी महिलेची निवड केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या अभिनंदनाचा ठराव                                   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनात भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविले अभिनंदन ठरावाचे पत्र

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी व केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. देवाजी तोफा, रायपूर ग्रामसभेचे अध्यक्ष सुभाष वळधा, प्रकाश नरोटे व गोटुल सेनेच्या वतीने देण्यात आले अभिनंदन ठरावाचे पत्र  भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी जनजाती (आदिवासी) समाजातील सर्वसामान्य परिवारातील असणाऱ्या श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची निवड केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांच्या वतीने भाजपाचे अभिनंदन करण्यात येत असून अभिनंदनचा ठराव व पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांना पाठविण्यात आले.

याप्रसंगी जिल्ह्यातील ग्रामसभांचे मार्गदर्शक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा ,रायपूर ग्रामसभेचे अध्यक्ष सुभाष वडधा,सचिव प्रकाश नरोटे गोटुल सेनेचे परमेश्वर गावडे ,तुळशीराम नैताम यांनी अभिनंदनाचे पत्र दिले

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना या ७५ वर्षाच्या काळामध्ये एकदाही आदिवासी समाजाच्या व्यक्तीला देशाच्या या सर्वोच्च पदावर बसता आले नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एका सर्वसामान्य आदिवासी परिवारातील असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मु यांची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी निवड करून आदिवासी समाजाला न्याय दिला आहे. यामुळे आदिवासी समाजाची मान उंचावली असून जगामध्ये आदिवासी समाजाचा गौरव वाढविला आहे. यासाठी संपूर्ण आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाचे समर्थन करीत असून या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांनी भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या ग्रामसभांच्या मार्फतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मां.नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी व केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव पारित केला व तो ठराव पत्राच्या माध्यमातून माननीय जे.पी.नड्डा यांना पाठविला. आहे.

Previous articleसुरजागडच्या माध्यमातून स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवा
Next articleमाजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वतः रक्तदान करून साजरा केले आपलं वाढदिवस..!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.