आशाताई बच्छाव
बेटमोगरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णसंख्येत वाढ, डेंग्यु,मलेरिया,टायफाईड,अतिसार च्या वाढत्या फैलावाने नागरिक त्रस्त,
सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत,पावसाळ्यामध्ये नागरिकांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी व टायफाईड,कावीळ,अतिसार,गॅस्ट्रो,कॉलरा,अशा प्रकारच्या आजारांपासून सुरक्षेसाठी,हात – पाय स्वच्छ साबणाने धुणे, पाणी उकळून पिणे, बाहेरील उघड्यावरील अन्न खाणे टाळावे,घराच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साठवून ठेवू नये साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरिया सारखे आजार पसरतात.
तसेच पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी खूप महत्वाची आहे. बेटमोगरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकुण १९ गावे येतात. या केंद्रांतर्गत हर घर दस्तक ही मोहीम सुरू आहे.ग्रामीण भागात अस्वच्छता, रोगाबद्दल माहीतीचा अभाव, प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष, अंधश्रद्धा यामुळे कँन्सर चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.त्यामुळे वेळीच खबरदारी घेवून सर्वेसाठी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करावे असे आवाहन प्रा.आ.केंद्र बेटमोगरा यांच्याकडून करण्यात येते.यासाठी प्रा.केंद्रा अंतर्गत असणारे आशा वर्कर, कार्यकर्ती व A.N.M.-M.P.W.ह्यांचे मार्फत घरोघरी भेटी देणे चालु आहे.
– डॉ.मनीषा भोरे
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र,बेटमोगरा
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड -सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मुखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये डेंगू मलेरिया चिकनगुनिया सदृश्य आजारांचे रुग्ण आढळू लागले आहेत. तालुक्यातील बेटमोगरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंगू मलेरियाच्या रुग्ण संकेत वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पावसाळ्यात दूषित हवा पाणी याबरोबरच डासांचाही सुळसुळाट झालेला असतो आणि सहाजिकच डेंगू मलेरिया टायफाईड अतिसार सारख्या आजारांच्या रुग्णांची संख्याही वाढते. डेंग्यू हा आजार एडीज इजिप्टी नावाच्या डासाच्या मादीने चावल्यामुळे होतो हा डास फार उंच उडू शकत नाही त्यामुळे तो पायाला चावतो शिवाय हा डास दिवसा विशेषता सकाळच्या वेळी चावतो डेंग्यू चा आजार पावसाळ्याच्या दिवसात आणि त्याच्या नंतर लगेचच्या महिन्यात म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या काळात जास्त पसरतो कारण या काळात डासांची पैदास होण्यासाठी अनुकूल वातावरण असते. सद्यस्थितीत मुखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ही डेंगू,मलेरिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत.
डेंग्यूची लक्षणे –
थंडी वाजून अचानक तीव्र ताप येणे.
डोके स्नायू आणि सांधे दुखणे, डोळ्यांच्या मागच्या भागात वेदना होणे.
डोळ्यांवर दाब दिल्याने किंवा डोळे चोळल्याने वेदना होणे.
खूप अशक्तपणा वाटणे भूक न लागणे मळमळणे व तोंडाची चव जाणे घशात बारीक दुखणे.
शरीरावर विशेषता चेहरा मान आणि छातीवर निळ्या काळ्या रंगाचे चट्टे उठणे.




