Home नाशिक व-हाणेत सट्टा मटका जोरात!  पत्रकारांनो पेपरात खुशाल छापा!!

व-हाणेत सट्टा मटका जोरात!  पत्रकारांनो पेपरात खुशाल छापा!!

159

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220706-140948_Google.jpg

व-हाणेत सट्टा मटका जोरात!  पत्रकारांनो पेपरात खुशाल छापा!!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-पाच मारुतीचे व-हाणे म्हणून अतिप्रसिध्द असलेले हे गांव मालेगांवपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर मनमाड रोडवरील मध्यवर्ती गाव म्हणून ओळखले जाते.या गावात अलिकडेच ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून आलिशान असे राममंदीर उभारले आहे.धार्मिक क्षेत्रात नावारुपास येत असलेल्या या गावात मात्र आता बिनधास्तपणे राजरोस पोलिस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याने सुरु आहे.एके काळी या गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात कै.तुकाराम भाऊ शंकर पवार यांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने गाजविले आणि दुर्दैवाची बाब अशी की,त्याच तुकाराम भाऊ पवार नगरात अगदी मराठी शाळा,माध्यमिक विद्यालय,व राममंदीराशेजारी हा सट्टा मटका जुगार सुरु असल्याने गावातील तरुण पिढी वाममार्गाला लागून उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती जाणकार व्यक्त करीत आहेत.तर मेहुणे ता.मालेगांव येथील महेंद्र नामक सट्टा माफीया हा जुगाराचा अड्डा चालवित असल्याची माहिती प्राप्त होत आहे.राजकारणात अग्रेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व-हाणे या गावात पिण्यासाठी पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही अशी परिस्थिती असताना अवैध धंद्यात मात्र आता या गावाचे नाव गाजत आहे.सट्टा मटका जोरात..पत्रकारांनो खुशाल पेपरात छापा..! ही सट्टा माफीयांची खेळी असून,वेळीच कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस प्रमुख डाँ.सचिन पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी हा अवैध धंदा कायमचा समूळ नष्ट करावा अशी मागणी आता जोर धरत आहे.

Previous articleरब्बी हंगामातील उर्वरित ७०% धानाची खरेदी करा आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleरस्त्यावरील अपघाताच्या ठिकाणी मोठे गतिरोधक तसेच सुरक्षा पत्रे बसवावेत परीसरातील नागरीक तसेच ग्रामस्थांनी केली मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.