Home नाशिक विद्यार्थी पटसंख्या अभावी बहुतांशी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर.

विद्यार्थी पटसंख्या अभावी बहुतांशी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर.

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0037.jpg

विद्यार्थी पटसंख्या अभावी बहुतांशी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर.

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे

बागलान तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात बहुतांश आदिवासी लोक वस्ती आहेत. यात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत बहुतेक वाडी वस्त्यांवर वस्ती शाळांची निर्मिती झाली होती. परंतु कालांतराने ह्या शाळा ओस पडू लागले आहेत. कारण या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या प्रमाणापेक्षा कमी होत असल्याने नाईलाजास्तव शालेय शिक्षण विभाग यांना या शाळा बंद कराव्या लागत आहेत. दिनांक .२८.६.२०२२ रोजी आमच्या प्रतिनिधीच्या निरीक्षणात ह्या शाळा निदर्शनास आले. त्यात साल्हेर पासून दहा किलोमीटर अंतरावर असणारे भिकार सोंडा या गावात साधारण दोन ते तीन वर्षापासून शाळा बंद झाली आहे.आता सध्या या गावातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बाहेर गावी शिक्षणासाठी जावे लागत आहे. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा स्थानिक रहिवाशी यांच्याशी चर्चा केली तेव्हा लक्षात आले की शासकीय आश्रम शाळा व इंग्रजी शाळा यांचा जो विद्यार्थी पट वाढवण्याचा कयास चालू आहे याचा बळी जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शाळा पडत आहेत. स्थानिक रहिवाशी यांच्या म्हणण्यानुसार आमची सुद्धा इच्छा नाही आमचे मुले दुसऱ्या गावाला शिक्षणाला जावे परंतु नाईलाज असतो आमच्या गावात पट संख्या नसल्याने आम्हाला आमचे मुलं दुसरीकडे पाठवावी लागत आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग किंवा तालुका गटविकास अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे व जिल्हा परिषद शाळेचा पट वाढवण्यास पूर्णपणे प्रयत्न करावेत.जेणेकरून आदिवासी मुलांना, मुलींना शिक्षणापासून वंचित न राहता आपले शिक्षण किमान पहिली ते चौथीपर्यंत गावातच पूर्ण होईल …..

Previous articleग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे धुळ खात बसला आहे गावचा विकास तहसील कार्यालयात निवेदन
Next articleपिक कर्ज वाटपासाठी स्वाभिमानीची बँकेवर धडक आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here