Home नांदेड धर्माबाद नगर परिषद निवडणूकित तृतीयपंथीयांचे पॅनल सर्व जागा लढविणार-रेखाताई देवकर

धर्माबाद नगर परिषद निवडणूकित तृतीयपंथीयांचे पॅनल सर्व जागा लढविणार-रेखाताई देवकर

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0020.jpg

धर्माबाद नगर परिषद निवडणूकित तृतीयपंथीयांचे पॅनल सर्व जागा लढविणार-रेखाताई देवकर

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील( युवा मराठा न्यूज)
राजकीय पटलावर स्वार्थी लो
कांकडे सातत्याने सतेची खुर्ची राहत असल्याने सर्वसामान्य लोकांचे मूलभूत प्रश्न अद्यापही कायम आहेत.स्वातंत्र्य मिळुन 70 वर्ष झाली तरीही साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही ही लाजिरवाणी बाब आहे परिवर्तनाचा ध्यास आम्ही उराशी बाळगला असून धर्माबाद नगर परिषदेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकित 22 पैकी 22 जागा तृतीयपंथीयांच्या पॅनल कडुन लढविणार असल्याचे नायगाव मतदार संघाचे तृतीयपंथीयाचे प्रमुख रेखा देवकर यांनी धर्माबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले
आम्हीं कोणत्याही राजकीय पक्षाचे बांधिल नाही.तसेच आमचा कोणताही पारिवारिक वारसदार नाही.त्यामुळे आमच्याकडून स्वच्छ व पारदर्शक कारभार होईल यात शंकाच नाही. कोणत्याही राजकीय पक्षाची कायमस्वरूपी नसते या पूर्वीही राजकीय पटलावर अनेक ठिकाणी तृतीयपंथीय निवडून आले आहेत येणाऱ्या नायगाव विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आम्ही आम्ही पूर्वीच जाहीर केले त्यावर ठाम आहोत त्याची पूर्वबांधणी म्हणून धर्माबाद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकित आमच्यापॅनल कडून 11 वार्डात 22 पैकी 22 जागा लढविणार आहोत. असेही रेखाताई देवकर म्हणाले.
शहरातील विविध नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या अनेकजण आमच्या पॅनलकडुन लढविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे स्वच्छ प्रतिमेचा व जनाधार असलेल्या योग्य व्यक्तीला आम्ही उमेदवारी देऊ असे म्हणत धर्माबाद शहर विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल उभे करण्यासाठी प्राथमिक तयारी झाली आहे राम चव्हाण बाळापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात येणार असल्याचेही रेखाताई देवकर यांनी सांगितले आहे.
नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे अनेक पक्षाच्या वतीने फिल्डिंग सुरू असतानाच शहरातील सर्व जागा लढविण्यासाठी प्रथमच तृतीयपंथीयांच्या वतीने एल्गार करण्यात आल्यामुळे भविष्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात वेगवेगळ्या चर्चाना सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेस विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील वलय असलेल्या व्यक्ति उपस्थित होत्या.

Previous articleजि.प.शाळा नेहरू नगर येथे नवागतांचे स्वागत.     
Next articleबामणी पोलिसांची धडक कारवाई देशी दारू च्या 154 बाटल्या ताब्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here