Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा सुरत बसचा वासखेडी गावात चालक वाहकासह लालपरीचा केला सत्कार..

शिंदखेडा सुरत बसचा वासखेडी गावात चालक वाहकासह लालपरीचा केला सत्कार..

145

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0014.jpg

शिंदखेडा सुरत बसचा वासखेडी गावात चालक वाहकासह लालपरीचा केला सत्कार..
वासखेडी /धुळे,(दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- येथे शिंदखेडा आगारातुन ससकाळी ७.०० सुटणारी सुरत शिंदखेडा बस (व्हाया)चिमठाणे,सवाई मुकटी,बोरीस,लामकाणी ,निजामपुर, वासखेडी,ब्राम्हणवेल,दहीवेल,मार्गे सुरत साठी धावणारी लालपरी ही सुरत वरून दुपारी ५:०० वा.याच मार्गाने परत जाण्यास सज्ज राहील ,या लालपरीचे सारथी श्री,योगेश कोळी व प्रवाशी रक्षक वाहक श्री सुनिल मोरे यांचा वासखेडीचे पत्रकार तथा कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री दिपकभाऊ जाधव,यांच्या वतीने ग्रामस्थांच्या शुभ हस्ते नारळ फोडुन शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला, तसेच बस मधील प्रवाशाचे महीलांनी कुंकु हळदीने औक्षण करून प्रवासास अनुकुल प्रतिसादा साठी लालपरी ला सहकार्या साठी शुभेच्छा ही दिल्या,प्रसंगी शंकरजी एज्यु,सोसायटीचे चेअरमन तथा निवृत्त प्रशासकीय अधिकारी दादासो,विठ्ठलराव ठाकरे,पत्रकार तथा कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ जाधव,पिंपळगांव बसवंत चे उद्योजक श्री,जितेंद्र गोरख साळुंखे, माझी उपसरपंच संभाजी धंजी कुवर,जितेंद्र शिंदे ,ज्येष्ठ नागरीक श्री,दिगंबर लोटन कुवर,अमृत यशवंत कुवर,बाळाजी सुर्यवंशी, अमृत मुजगे,रावसाहेब‌ नेरकर प्रकाश जाधव,शाळेचे मुख्या,व्ही,वाय सोनवणे,एन,डी,पाटील ,दिगंबर दामु कुवर, धनराज जयदेव, बापु सुर्यवंशी, मुजगे,महेंद्र मच्छिंद्र कुवर,मनोहर कुवर,राजेंद्र माळचे,विजय बेडसे,संदीप कौतिकराव कुवर,महेन्द्र भवरे,छोटु वाघ,मनोहर नेरकर आदींनी बस चालु झाल्याचा गावकरी आणि परीसरातील नागरीकांना पत्रकार दिपकभाऊ जाधव यांचे आभार मानत चालक वाहकांना यशस्वी शुभेच्छा प्रधान केल्या ,सौ,निर्मलाताई देवरे,सौ,सोनाली जाधव,सौ,शकुंतला जाधव,तसेच राजबाई भवरे,यांनी प्रसंगी हळदी कुंकु ने लालपरी व प्रवासी यांचे परंपरे नुसार औक्षण करून शुभेच्छा दिल्या,तसेच पत्रकार दिपकभाऊ जाधव व ग्रामस्थांनी धुळे विभाग नियंत्रक सौ,सपकाळ मॅडम, व शिंदखेडा आगार प्रमुख श्री,अनिलजी गावित साहेब यांचे मनस्वी आभार मानले