Home नाशिक देवळा तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना “आम्ही मेशीकर ग्रुपतर्फ” मोफत वहया पाठयपुस्तके वाटप

देवळा तालुक्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना “आम्ही मेशीकर ग्रुपतर्फ” मोफत वहया पाठयपुस्तके वाटप

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0009.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी:- मेशी ता.देवळा येथील जनता विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही मेशीकर ग्रुपतर्फे मोफत पाठ्यपुस्तक वाटप.
मेशी येथील रहिवासी व नोकरी, व्यवसाय निमित्त बाहेर गावी राहत असलेले व गावातील काही सामाजिक काम करणाऱ्या युवकांनी आपण गावाचे काही देणे लागतो ह्या उदात्त हेतूने मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात एकत्र येत १ मे २०२१ रोजी हा ग्रुप तयार करत सर्वांनी आर्थिक मदत करत कोव्हीड विलगिकरण कक्ष स्थापन केले त्यामुळे कोव्हीड रुग्णांना याचा चांगल्या प्रकारे फायदा झाला. त्यानंतर एक वर्षानी ह्या ग्रुपने शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील तरुणांना येत असलेल्या अनेक अडीअडचणींवर मात करता यावी व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून ह्या ग्रुपच्या माध्यमातून एक मे २०२२ रोजी पाच प्राथमिक शाळांना १२ टॅब संगणक तज्ञ शिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले.यामुळे ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे लाभ मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी आम्ही मेशीकर ग्रुपचे कौतुक केले .व आता नुकत्याच शाळा सुरू झाल्याने नववी व दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
शासन इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक देत असते परंतू इयत्ता नववी आणि दहावीच्या काही विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असली तरी गरिबीच्या परिस्थितीमुळे पाठ्यपुस्तके घेता येत नसल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून इच्छा असूनही दूर असता अशा गरीब विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेत आम्ही मेशीकर ग्रुपच्या वतीने आणखी एक महत्वपूर्ण समाजोपयोगी कार्य करत जनता विद्यालयात ग्रुपच्या वतीने काही सदस्यांच्या उपस्थित मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. अगदी कमी दिवसांतच आम्ही मेशीकर ग्रुपने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतल्याने ह्या ग्रुपचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी मेशी विकास सोसायटीचे सभापती राजू शिरसाठ, देवळा पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य शाहू शिरसाठ, पवन गरुड,समाधान गरुड, समाधान जाधव,भगवान शिरसाठ, राजेंद्र बोरसे,निवृत्ती चव्हाण,प्रकाश गरुड यांसह विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते.
प्रतिक्रिया :- १) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करत शिक्षण पूर्ण करावे लागते विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखत त्यांना मदत करणे हे एक ग्रुपतर्फे चांगले काम होत असून याचे आम्ही भाग्य समजतो.
——साहेबराव शिरसाठ, ज्येष्ठ सदस्य आम्ही मेशीकर ग्रुप
२) पालकांची गरिबीची परिस्थिती त्यातच ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला आलेले वाईट दिवस या संकटातून मार्ग काढत गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी आम्ही मेशीकर ग्रुपच्या वतीने वेळोवेळी अशा विद्यार्थ्यांसाठी योग्य ती मदत केली जाईल.
——संजय कापसे, सदस्य आम्ही मेशीकर ग्रुप

Previous articleमुलचेरा तालुक्यातील ग्रा.प.कोटारी अंतरंगत बंदुकपल्ली येते माता मंदिर उदघाटन..!!
Next articleझाडीला विद्यार्थ्याचे डि.जे.लावून मिरवणूक काढून स्वागत!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here